Tarun Bharat

उद्योजक मुकेश अंबानींची संपत्ती 92 अब्ज डॉलर्सवर

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या खासगी संपत्तीचे मूल्य 92.6 अब्ज डॉलर्सवर पोहचले असून 100 अब्ज डॉलर्सच्या टप्याजवळ पोहचले आहे. एक आठवडय़ात कंपनीचे समभाग 19 टक्के इतके वाढले असल्याची बाब समोर आली आहे.

गेल्या एक आठवडय़ात रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग 19 टक्के इतके शेअर बाजारात वाढले. 2 हजार 65 रुपयांवर असणारा समभागाचा भाव 2 हजार 422 रुपयांवर पोहचला आहे. सोमवारीच या समभागाने वर्षाचा उच्चांकी स्तर प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2 हजार 368 रुपये होता. व्यावसायिक यशाच्या तुलनेत पाहता देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून रिलायन्सची गणना होते. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी जगात 12 व्या क्रमांकाचे यशस्वी उद्योजक  आहेत.

बेजोस सर्वात श्रीमंत व्यावसायिक

जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून ऍमेझॉनचे जेफ बेजोस आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर टेस्लाचे एलॉन मस्क आहेत. बिल गेटस् चौथ्या नंबरवर असून ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची संपत्ती यावर्षी आतापर्यंत 15 अब्ज डॉलर्सने वाढलेली आहे.

Related Stories

तांत्रिक समस्याग्रस्त गुंतवणूकदारांना दिलासा

Amit Kulkarni

ड्रिमफोक्स सर्व्हिसेसचा आयपीओ लवकरच

Patil_p

अखेर सेन्सेक्स-निफ्टीच्या तेजीला विराम!

Patil_p

संपत्तीत गौतम अदानी – मुकेश अंबानी बरोबरीत

Amit Kulkarni

टीसीएसची उमेदवार भरतीसाठी टेस्ट

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 288 अंकांनी तेजीत

Patil_p
error: Content is protected !!