Tarun Bharat

उधमपूरमध्ये स्फोटात एक ठार, 14 जखमी

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमधील उधमपूर शहरात सलाठिया चौकातील बाजारपेठत बुधवारी दुपारी स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका जखमीला अधिक उपचारार्थ जम्मूला पाठवण्यात आले आहे. स्फोटासाठी हलक्मया आयईडीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जास्तीत जास्त जीवितहानी करण्यासाठी स्फोटकांसह छर्रे वापरण्यात आले होते. मात्र, स्फोटावेळी बाजारपेठेत गर्दी कमी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

उधमपूर येथील स्फोट झालेले घटनास्थळ सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील  असून जवळच तहसील कार्यालय आहे. मात्र, या भागात कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांना हा स्फोट घडवून आणण्यात यश आले. भाजीच्या स्टॉलजवळ हा स्फोट झाला असून तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला तरुण तळपाड येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच वरि÷ पोलीस अधिकाऱयांसह लष्कराचे अधिकारी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. उधमपूरचे एसएसपीही घटनास्थळी पोहोचले होते. एफएसएल टीमने घटनास्थळावरून स्फोटाचे नमुने गोळा केले आहेत. मात्र हा स्फोट कसा झाला याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

स्फोटात गंभीर जखमी झालेल्या एकाचे नाव हीरा लाल असून तो राजस्थानचा रहिवासी आहे. तो मोबाईलच्या दुकानात काम करायचा. त्याला जम्मू येथील जीएमसी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

Related Stories

आरोपींच्या याचिकेवर 25 फेबुवारीला सुनावणी

Patil_p

या महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली

Archana Banage

पंतप्रधान आज साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

Patil_p

आसाम : भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडली EVM मशीन

datta jadhav

मातेच्या दुधासाठी मागणीचा महापूर

Patil_p

भारतात तिसऱ्या लसीला हिरवा कंदील

datta jadhav