Tarun Bharat

उध्दव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी जाणार का? या विषयाची चर्चा रंगली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्याला जाण्यासाठी उद्धव ठाकरे येणार निमंत्रणची गरज नाही असे विधान केले आहे. 


राऊत म्हणाले, अयोध्या आणि शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. आमचे हे नाते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही आयोध्येत जात नाही आणि कधी गेलोही नाही. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे हे अयोध्येत गेले आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. 


अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला. राममंदिरात येणारे अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. राम मंदिरासाठी श्रध्देने आणि हिंदुत्वाच्या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.  

दरम्यान, अयोध्येप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊत यांनी थेट भाष्य करणे टाळले. देशातील डॉक्टर, पोलीस, नर्स आणि वॉर्ड बॉय हे कोरोनाशी लढत आहेत. बलिदान देत आहेत. आपल्या सर्वांवर देवाचेच आशीर्वाद आहेत, असं सांगत राऊत यांनी या प्रश्नावर अधिक बोलणं टाळले.

Related Stories

डीसीजीआयच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात फायझर, मॉडर्नासारख्या परदेशी लसी येण्याचा मार्ग मोकळा

Archana Banage

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; हे आहेत नवे दर

Tousif Mujawar

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

Archana Banage

महाराष्ट्र : विकेंड लॉकडाऊनला भाजप सहकार्य करणार : देवेंद्र फडणवीस

Tousif Mujawar

१ कोटी ३३ लाखांच्या सुपारीची चोरी; कंटेनर चालक फरार

Abhijeet Khandekar

सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..हे तर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम- रविकांत वरपे

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!