Tarun Bharat

उपनोंदणी अधिकारी जाळय़ात

बाँड रायटरलाही अटक : फोन पेद्वारे घेतली लाच

प्रतिनिधी /बेळगाव

वाटणीपत्र नोंदणी करण्यासाठी एका शेतकऱयाकडून लाच घेताना मुरगोड (ता. सौंदत्ती) येथील उपनोंदणी अधिकारी व बाँड रायटर एसीबीच्या जाळय़ात अडकले आहेत. बुधवारी ही कारवाई करण्यात आली असून फोन पेद्वारे लाच स्वीकारल्याचे उघडकीस आले आहे.

कोडलीवाड (ता. सौंदत्ती) येथील शिवाप्पा मुत्याप्पा वरगण्णावर या शेतकऱयाने दिलेल्या फिर्यादीवरून उपनोंदणी अधिकारी संतोष कपली, बाँड रायटर शिवाण्णा ऊर्फ शिवयोगी शंकरय्या मलय्यण्णवर या दोघा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या अधिकाऱयांनी दहा हजार रुपये मागितले होते.

एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची चौकशी करण्यात येत होती.

शिवाप्पा वरगण्णावर यांच्या वाटणीपत्राची नोंदणी करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 6 हजार रुपये फोन पे द्वारे घेऊन वाटणीपत्राची वाटणी करण्यात आली होती. शिवाप्पा यांना मात्र 2 हजार 765 व 105 रुपयांच्या दोन पावती देण्यात आल्या होत्या.

सरकारी अधिकाऱयांमध्ये खळबळ

शिवाप्पा यांनी वाटणीपत्राची मागणी केली त्यावेळी उर्वरित चार हजार रुपये देऊन वाटणीपत्र घेऊन जा, असे सांगण्यात आले. उर्वरित चार हजार रुपये स्वीकारताना उपनोंदणी अधिकारी व बाँड रायटरला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने सरकारी अधिकाऱयांमध्ये खळबळ माजली आहे.

Related Stories

बेळगाव श्री शरीरसौष्टव स्पर्धा 26 रोजी

Amit Kulkarni

काँग्रेस रोड-खानापूर रोडवर वाहनांची कोंडी

Amit Kulkarni

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मोदेकोप येथील तरुणाचा बळी

Tousif Mujawar

कोनवाळ गल्ली नाला बांधकामाचा शुभारंभ

tarunbharat

दोन महिन्यात 367 कुत्र्यांची नसबंदी

Amit Kulkarni

चिकोडी विभागात कोरोना मीटर सुसाट

Patil_p