Tarun Bharat

उपनोंदणी कार्यालयातील एका एजंटला कोरोनाची लागण

प्रतिनिधी/ बेळगाव

सर्वात जास्त महसूल देणारे कार्यालय म्हणून उपनोंदणी कार्यालयाकडे पाहिले जाते. अनेक कार्यालये बंद असली तरी उपनेंदणी कार्यालय कधीच बंद करण्यात आले नाही. नेहमीच या ठिकाणी गर्दी दिसत होती. मात्र आता या कार्यालयात काम करणाऱया एका एजंटलाच कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर तातडीने सोमवारी पूर्ण कामकाज बंद करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयाचे सॅनिटायझरही करण्यात आले आहे.

उपनोंदणी कार्यालयामध्ये खरेदी-विक्री तसेच इतर कामांसाठी मोठय़ा प्रमाणात दररोज गर्दी उसळते. त्या ठिकाणी अधिकाऱयांनी सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न केला तरी गर्दीमुळे ते शक्मय नाही. याचबरोबर त्या ठिकाणी सॅनिटायझरही उपलब्ध करण्यात आले नव्हते. नेहमीच धावपळ सुरू असते. त्यामुळे आता एका एजंटाला या कोरोनाची बाधा झाली असली तरी या कार्यालयातील आणखी किती कर्मचाऱयांना तसेच इतर एजंटांना बाधा झाली आहे का? याचा तपास करणे गरजेचे आहे.

आता कार्यालय सॅनिटायझर केले तरी कर्मचाऱयांची तपासणी होणेही गरजेचे आहे. अन्यथा या कार्यालयातून मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रसार होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. उपनोंदणी अधिकारी विष्णू तीर्थ यांनी सोमवारी कामकाज बंद असले तरी मंगळवारी कामकाज सुरू राहणार आहे. मात्र सोशल डिस्टन्स ठेवूनच काम केले जाईल. त्याचबरोबर मोजकीच कामे करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. 

Related Stories

अज्ञात वाहनाच्या धडकेत आंबेवाडीचा युवक जागीच ठार

Amit Kulkarni

सुराज्य करण्याचे कार्य ‘लोकमान्य’च्या माध्यमातून सुरू

Amit Kulkarni

बेंगळूर: मेट्रोच्या ८० हून अधिक कामगारांना कोरोना

Archana Banage

अतिवाड संपर्क रस्त्यावर कोसळले झाड

Rohit Salunke

मरकजमध्ये सामील, पण माहिती ठेवली लपवून!

Patil_p

भातरोप लागवडीसाठी पोषक वातावरण

Amit Kulkarni