Tarun Bharat

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभास अभिवादन

 ऑनलाईन टीम / पुणे :

कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. आज सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विजयस्तंभास अभिवादन केले.

यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार म्हणाले, विजयस्तंभाचा एक वेगळा इतिहास आहे. देशभरातून लाखो लोक दरवर्षी येथे अभिवादन करण्यास येत असतात. मी देखील राज्यातील जनतेच्यावतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. येथे येणाऱया प्रत्येकाने शांतता पाळावी, परिसरातील स्वच्छता टिकवावी. कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

अभिवादन सोहळा शांततेत पार पाडवा, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 740 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर आहे.

Related Stories

बार्शीतील खांडवीत टिप्परच्या जॅक मध्ये अडकून चालक ठार

Archana Banage

विडी कारखाने सुरू करा, अन्यथा कारवाई : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

Archana Banage

धोका वाढला : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख पार

Tousif Mujawar

दोन मंत्र्यांचं जम्बो सरकार,येत्या काही दिवसात कोसळणारचं-आदित्य ठाकरे

Abhijeet Khandekar

परप्रांतीय मजुरांना घेऊन कुर्डुवाडीहून लखनऊकडे विशेष रेल्वे रवाना

Archana Banage

सोलापूर शहरात 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage