Tarun Bharat

उपमुख्यमंत्र्यांकडून माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


“सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायांना माघी गणेशजयंतीच्या निमित्तानं भावपूर्ण वंदन करतो. श्री गणरायांनी राज्यावरचं, देशावरचं कोरोनाचे संकट दूर करावे. सर्वांना स्वच्छंद फिरता येईल, असे कोरोनामुक्त वातावरण पुन्हा निर्माण व्हावे. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात भरभराट व्हावी.

जनतेच्या जीवनातील दू:खं दूर होऊन प्रत्येकजण सुखी, समाधानी, आनंदी व्हावा, अशी प्रार्थना मी श्री गणरायांच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


माघी गणेश जयंती साजरी करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Related Stories

पालघर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे : गृहमंत्री अनिल देशमुख

prashant_c

”लॉकडाऊनबाबत राज्य सरकार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता”

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 24 तासात 1233 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

Rohan_P

आरे कारशेड अहवाल बंधनकारक नाही : आदित्य ठाकरे

prashant_c

सीएएला विरोध केल्याने अमित शाह यांच्या समोरच तरुणाला मारहाण

prashant_c
error: Content is protected !!