Tarun Bharat

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोरोनाचे नियम धाब्यावर

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सरकारमधील दोन मंत्र्यानी पंढरपुरात बैठक घेतली. या बैठकीप्रसंगी मोठया प्रमाणावर कार्यकार्त्यांनी गर्दी केली. सोशल डिस्टन्सचा फ्ढज्जा उडाला गेला. परिणामी खुदद उपमुख्यमंत्र्यांच्याच बैठकीत कोरोनाचे सरकारनेच केलेले नियम धाब्यावर बसवले गेल्याचे चित्र निर्माण झाले.

येथील कराड रोडवरील श्रीयश पॅलेस येथे उपमुख्यमंत्री पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे अशा तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत विचार विनीमय बैठक पार पडली. या बैठकीसाठी प्रारंभी केवळ 100 व्यक्तींच उपस्थित राहतील. असे नियोजन करण्यात आले होते. मात्र बैठकीच्या हॉलबाहेर सुमारे 1 हजारांहून अधिक कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. कार्यकर्त्याची उपमुख्यमंत्री पवार यांना भेटण्याची ओढ लक्षात घेता पोलिसांनी नंतर सर्वांनाच हॉलमध्ये सोडले. याठिकाणी कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले गेले नाही. अनेकांच्या तोंडावर मास्क देखिल नव्हते. त्यामुळे एकप्रकारे निवडणुकीमध्ये पक्षांच्या  बैठकींच्या निमित्ताने एकप्रकारे कोरोनाला आमंत्रणच देण्यात आल्यांचे बोलले जात आहे.

एकीकडे राज्यात सरकारकडून कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन केले जात आहे. मास्क न वापरणा-यावर कोटयवधींचा दंड वसुल केला जात आहे. मुख्मंत्र्यांनी तर `मी जबाबदार’ अशी घोषणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिली. असे असताना सरकारमधील तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नियमबाहय गर्दीला कोण जबाबदार असणार? असा सवाल सामान्यांमधून चर्चिला जात आहे.

जयंत पाटील यांची सारवासारव

राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी झाली. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी `कोरोनाचे नियम पाळले पाहीजेत. गर्दी झाली. आपल्या आरोग्याच्या काळजी घेतली पाहीजे’ असे सांगत एकंदर गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा उडालेला फ्ढज्जा लक्षात घेता आपल्या भाषणाच्या प्रारंभी सारवासारव केली.

Related Stories

Solapur : संप्रदा बीडकर यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार

Abhijeet Khandekar

अक्कलकोट : शिस्तीसाठी महसूल प्रशासनाची दंडात्मक कारवाई

Archana Banage

सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार

Archana Banage

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पाचपट वाढ

Archana Banage

सोलापूर : घरफोड्या करणार्‍या चोरट्यांना अटक ; एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

कडेगाव व पलुस तालुक्यातील ९ जण चार जिल्ह्यातून हद्दपार

Abhijeet Khandekar