Tarun Bharat

उपमुख्यमंत्र्यांनी बिम्स रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांचा घेतला समाचार

बेळगाव/प्रतिनिधी

राज्याचे उपमख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज शनिवारी सकाळी बेळगाव मधील बिम्स रुग्णालयाला अचानक भेट देऊन येथील परिस्थीचा आढावा घेतला. दरम्यान बिम्स हॉस्पिटल बाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन उपमुख्यमंत्री सवदी यांनी आज शनिवारी अचानक रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नाराजीही व्यक्त केली. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर व्यवस्थितरीत्या उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी ऐकूण ते चांगलेच संतापले. त्यांनी यावेळी गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचे असे हताश उद्गारही त्यांनी काढले.

बिम्स सिव्हिल रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसह, ब्लॅक फंगस आणि अन्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. याची दखल घेत आज उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळी बीम्स रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून रुग्णायात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला.

बिम्सला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री सवदी यांनी नागरिक, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावरील तक्रारी पाहीन मी आज जाणीवपूर्वक रुग्णालयाला भेट देत येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मी स्वतः पीपीई किट घालून कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, असे यांनी सांगितले. तसेच गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचे असे हताश उद्गारही त्यांनी काढले.

Related Stories

झाडांच्या फांद्यांमध्ये हरवला सिग्नल!

Amit Kulkarni

पतंजलीतर्फे योग कक्षाचा वर्धापन दिन साजरा

Omkar B

जिल्हय़ातील 1235 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

कर्नाटक: मुख्यमंत्री आठवड्यातून एक दिवस भाजप आमदारांची ऐकणार गाऱ्हाणे

Archana Banage

मुलाच्या खुनाचा छडा लावा अन्यथा उपोषण करू

Tousif Mujawar

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेची उत्साहात सांगता

Patil_p