Tarun Bharat

उपांत्य फेरी गाठत निखत झरीनचे पदक निश्चित

अनामिका, परवीन, पूजा, मनीषा जस्मिनची आगेकूच

वृत्तसंस्था/ इस्तंबुल

Advertisements

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱया भारतीय बॉक्सर निखत झरीनने येथे सुरू असलेल्या आयबीए महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेत 52 किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठत भारताचे पहिले पदक निश्चित केले.

प्रतिष्ठेच्या स्ट्रँडा मेमोरियल स्पर्धेपासून सुरू झालेली घोडदौड 25 वर्षीय झरीनने Rयेथील स्पर्धेत कायम ठेवत इंग्लंडच्या चार्ली सियान डेव्हिसनचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. तिने स्ट्रँडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. दोघींनी प्रारंभापासूनच एकमेकांवर आक्रमणास सुरुवात करीत जोरदार ठोसेबाजी केली. पण दुसऱया फेरीत मात्र एकतर्फीच लढत झाली. झरीनने डेव्हिसनच्या शरीरावर जोरदार ठोसे लगावत तिला दमवले. तिने अचूक व जबरदस्त पंचेसचा वापर केला. दोन फेऱया जिंकल्यानंतर आक्रमणाची गरज नसल्याने झरीनने बचावात्मक कौशल्य सादर करण्यावर भर दिला. डेव्हिसनला फारशी संधी न देता तिने ही लढत जिंकून आगेकूच केली.

याआधीच्या लढतीत झरीनने मंगोलियाच्या लुत्सैखान अल्तानत्सेगत्सेगवर 5-0 असा विजय मिळविला होता. त्याचप्रमाणे परवीनने अमेरिकेच्या जाजैरा गोन्झालेझला 5-0, अनामिकाने ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टी ली हॅरिसला याच फरकाने हरविले होते. 60 किलो गटात जस्मिनची लढत मात्र जबरदस्त झाली. तिने शानदार प्रदर्शन करीत ऑस्ट्रेलियाच्या अँजेला हॅरीजवर मात केली. पंचांनी पहिल्या फेरीतच ही लढत थांबवून जस्मिनला विजयी घोषित केले. तिची पुढील लढत रशिदा एलिसशी होणार आहे. शिक्षा (54 किलो), अंकुशिता (66 किलो) यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. शिक्षाला मंगोलियाच्या ओयुनत्सेगत्सेगकडून 3-2 तर अंकुशिताला पोलंडच्या ऍनेटा रायजीलस्काकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला.

48 किलो गटाच्या लढतीत नितूचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तिला विद्यमान आशियाई चॅम्पियन कझाकच्या अलुआ बाल्किबेकोव्हाने 3-2 अशा फरकाने हरविले. 21 वर्षीय नितू दोन वेळची युवा वर्ल्ड चॅम्पियन असून तिने सावध सुरुवात करीत तिने प्रतिस्पर्धीला आपल्यापर्यंत येण्याचे धोरण ठेवले. मात्र तिला स्वतःलाच पंचेस मारण्यासाठी झगडावे लागले. बाल्किबेकोव्हाचा बचाव भेदण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला. पण कझाकच्या बॉक्सरने वेगवान हालचाली करीत आपला बचाव केल्याने नितूला यश मिळाले नाही. शेवटच्या फेरीत नितूने वेग व खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला. पण तिला खूप उशीर झाला होता. पंचांनी बाल्किबेकोव्हाच्या बाजूने निकाल देत तिला विजयी घोषित केले.

मनीषा (57 किलो), परवीन (63 किलो), पूजा रानी (81 किलो), अनामिका (50 किलो), नंदिनी (81 किलोवरील) यांच्या उपांत्यपूर्व लढती रात्री उशिरा  होणार आहेत.

Related Stories

अलकॅरेझ-व्हेरेव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत

Patil_p

इंग्लिश संघात भारताला नमवण्याची क्षमता

Amit Kulkarni

एस. शरथची कनिष्ठ निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती

Patil_p

2026 विश्व बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन भारतात,

Patil_p

बंगाल, मुंबईसह 7 संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलैपासून

tarunbharat
error: Content is protected !!