Tarun Bharat

उपेंद्र कुशवाहांवर अटकेची टांगती तलवार

Advertisements

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारची राजधानी पाटण्यातील एमपी/एमएलए न्यायालयाने संजदचे नेते उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात जारी अजामिनपात्र वॉरंटप्रकरणी वैशाली पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. वॉरंटवर अंमलबजावणी करण्याचा आणि 15 ऑक्टोबर रोजी अहवाल सादर करण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे. 2019 मध्ये नोंद एका गुन्हय़ाप्रकरणी अंतरिम जामीन मिळूनही एमपी/एमएलए न्यायालयासमोर आत्मसमर्पण न केल्याप्रकरणी संजद नेत्याच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. कुशवाह यांच्यावर जमाव गोळा करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, लोकांना ईजा पोहोचविण्याचा आणि एक शासकीय कर्मचाऱयाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा गुन्हा नोंद आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार एका आरोपीला अंतरिम जामीन मिळाल्यावर आत्मसमर्पण करत बाँड सादर करावा लागतो.

Related Stories

पेट्रोल आणि गॅसदर नियंत्रणात ठेवण्यासाठी योजना

Patil_p

पंजाब काँग्रेसमधील कलह सुरूच

Patil_p

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन मिळणार 1,200 रुपयात

Amit Kulkarni

कोरोनाचा विळखा घट्ट

tarunbharat

दिल्लीत 96 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

नॅशनल पार्कमधून हटणार राजीव गांधींचे नाव

Amit Kulkarni
error: Content is protected !!