Tarun Bharat

उभादांडा येथील ‘वुडहाऊस’ला उधाणाचा तडाखा

Advertisements

किनाऱयावर चुकीच्या ठिकाणी बांधकाम : एमटीडीसीचा लाखोचा निधी पाण्यात : संरक्षक बंधाराही खचला

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले सागरेश्वर किनारी एमटीडीसीने लाखे रुपये खर्च करून पर्यटन वाढीच्या दृष्टीने वुडहाऊस (लाकडी घरे) उभारली आहेत. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे समुदाला आलेल्या उधाणाचा तडखा या वुडहाऊसला बसला. सदर वुडहाऊस समुद्रात कोसळले आहे. किनाऱयावरील संरक्षक बंधाराही वाहून गेला आहे. भविष्याचा विचार न करता वुडहाऊसचा बांधकाम चुकीच्या ठिकाणी केल्यामुळे शासनाच्या लाखो रूपयांच्या निधीचा चुराडा झाल्याचे मत स्थानिक
ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत लाखो रुपयांच्या निधीतून उभादांडा सागरेश्वर किनारी समुद्रानजीक सुमारे 50 मीटरच्या क्षेत्रात वुडहाऊस (लाकडी घरे) व लाकडी फुटपाथचे प्रकल्पाचे काम केले. शनिवारी रात्री वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे समुद्राला उधाण आले होते. लाटा उसळून किनाऱयावर पहाटेपासून धडकू लागल्या होत्या. यामुळे संरक्षक बंधारा तुटून समुद्रात खचला. यामुळे किनाऱयावर उभारलेले वुडहाऊस समुद्रात कलंडले आहेत. मच्छीमारांना याची कल्पना उभादांडा ग्रामपंचायतीला दिली. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी ए. जे. जाधव यांनी सागरेश्वर किनारी तात्काळ जाऊन पाहणी केली. तसेच तलाठी श्री. गोरड यांनी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागास माहिती दिली. यावेळी ग्रा. पं. सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण अंगाचेकर, डुमींग डिसोजा उपस्थित होते.

प्रकल्पाच्या बांधकामासाठी परप्रांतीयांना ठेका

सदरचे वुडहाऊस प्रकल्पाचे काम हे परराज्यातील ठेकेदारामार्फत केले गेले आहे. सदर कामासाठी आलेल्या मजुरांना हिंदी, मराठी किंवा स्थानिक भाषाच समजत नव्हती. सुमारे दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते. यासाठी वापरण्यात आलेली लाकडेही ही बाहेरच्या राज्यातून आणली होती.

प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण

वेंगुर्ले तालुक्मयातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱया सागरेश्वर किनारी परिसरात यापूर्वी टेंट पर्यटन प्रकल्प पर्यटन विकास मंडळाने प्रकल्प राबविला होता. तोही जमिनीच्या वादामुळे अधुरा ठरला. त्यातही पर्यटन विकास मंडळाचे म्हणजे शासनाचा निधी वाया गेलेला आहे. तसेच समुद्र किनारी पर्यटन विकास मंडळाने उभारले बांबूचे टेंटसुद्धा सागरी उधाणामुळे वाहून गेले आहेत. असे असताना किनारी भागात हा वुडहाऊस प्रकल्पाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने गेले दीड ते दोन वर्षे काम सुरू होते. या प्रकल्पाचे जवळजवळ 80 टक्के काम हे पूर्ण झाले होते. शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाला उधाणाचा फटका बसला आहे. प्रकल्प उभारताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही, असा होत आहे.

स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही!

गेल्या तीन वर्षात सागरेश्वर किनारी होणाऱया या प्रकल्पाकडे भविष्यात उद्भवणाऱया धोक्याबाबत विचार केला नाही. प्रकल्प उभारताना एमटीडीसीचे अधिकारी तालुक्याच्या अधिकाऱयांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे असंख्य वर्षे वावणाऱया व किनाऱयाचा अनुभव असलेल्या स्थानिकांचा मतांचा विचार कुणीच केला नाही. याचा फटका लाखो रूपये खर्च करून बंधारा व ‘वुडहाऊस’ सागरी उधाणांत नेस्तनाबुत होण्याची वेळ आली, असे मत भाजपचे पदाधिकारी हितेश धुरी यांनी व्यक्त केले.

Related Stories

आपत्ती व्यवस्थापनासाठी सावंतवाडीत ‘ऍक्शन प्लान’

Patil_p

लवकरच देशव्यापी चक्काजाम आंदोलन!

NIKHIL_N

‘कोकणकन्या’च्या इंजिनमध्ये बिघाड

Patil_p

मालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी

Anuja Kudatarkar

गोविंद गावडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Abhijeet Khandekar

दुकानगाळय़ांचा प्रस्ताव अडकला वरिष्ठ कार्यालयात

Patil_p
error: Content is protected !!