Tarun Bharat

उमेद अभियानातील महिलांनी काढला मूक मोर्चा

मूक मोर्चातून शासनाचा निषेध नोंदविला :  12-टीबी 2-मोर्चात सहभागी झालेल्या उमेद अभियानातील महिला

प्रतिनिधी / सातारा

उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱयांची फेरनियुक्ती थांबविणे आणि अभियान बाह्य संस्थेकडे वर्गच्या हालचाली सुरू झाल्याने 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे सातारा जिह्यातील सुमारे 10 हजार महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. मूक मोर्चातून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना महिलांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले.

  महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सूरू आहेत. या अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती आहे. संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू रहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी राज्यातील 10 लाख महिलांनी एल्गार पुकारला आहे.

  सातारा जिह्यातील उमेद अभियानातील अधिकारी, कर्मचारी महिला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा घेवून आल्या. महिलांच्या हातात शासनाच्या निषेर्धाचा फ्लेक्स होते. या फ्लेक्सवर 1 वर्षापासून प्रलंबित असलेल्या ग्रामसंघ स्तरावरील विविध निधी त्वरित वितरीत करण्यात यावे. उमेद अभियानामध्ये त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप नको, 10 सप्टेंबर 2020 चे परिपत्रक रद्द करून कर्मचाऱयांचे पुन्हा करार नुतनीकरण करावे. सीआरपी बॅक सखी व इतर गावस्तरावरील कर्मचारी यांचे मानधन 10 हजार करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. महिलां मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.  ही उपस्थिती लक्षवेधी ठरली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीस बंदोबस्त तैनात होता.   

Related Stories

सातारा : शिष्यवृत्ती न देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

datta jadhav

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या साताऱयात

Patil_p

साताऱ्यात दोन फ्लॅट फोडले; 1.94 लाखांचा ऐवज लंपास

datta jadhav

सेवागिरीची यात्रा प्रेरणादायी ठरेल

Patil_p

बुद्धीचा सदुपयोग करणे आवश्यक

Patil_p

सातारा : लक्ष्मी टेकडीवरील घरकुलात सुविधाचा अभाव

Archana Banage