Tarun Bharat

‘उमेद’ ला बांधू नका कंत्राटदारांच्या दावणीला

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत कर्मचारी, कंत्राटी अधिकारी यांच्या पुनर्नियक्त्या थांबवण्यात आल्या आहेत. त्याविरोधात रत्नागिरी जिल्हय़ातील ‘उमेद’चे सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी सोमवारी रस्त्यावर उतरले. उमेद अभियानातील पदभरती कायम ठेवावी, त्यांच्या पुनर्नियक्ती करावी व ही पदभरती बाहय़ यंत्रणेकडून करण्यात येऊ नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

   त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण रत्नागिरी ाजिल्हय़ात एकूण 89 अधिकारी व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यानुसार जिल्हा अभियान व्यवस्थापक 1, जिल्हा व्यवस्थापक 3, तालूका अभियान व्यवस्थापक 6, तालूका व्यवस्थापक 2, प्रभाग समन्वयक 32, तालुका व प्रभाग समन्वयक सेंद्रीय शेती 6, सहाय्यक कर्मचारी 18 असे एकूण 89 अधिकारी, कर्मचारी यांचे उमेद अभियानात महत्वपूर्ण योगदान आहे. या अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांच्या देण्यात येणाऱया महत्वपूर्ण योगदानातून जिह्यामध्ये एकूण सर्व प्रकारच्या समूह संसाधन व्यक्ती- 1432, एकूण स्वयंसहाय्यता समूह 16925, एकूण प्रभागसंघ 55, एकूण ग्रामसंघ – 839 या गावस्तरीय संस्थामार्फत अभियानामध्ये एकूण 186175 महिला सदस्य जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या मध्ये क्षमता व संस्थीय बांधणी आधारे एक चांगल्या प्रकारचे संघटन निर्माण होऊन उपजीविका निर्मितीचा टप्यापर्यंत अभियान येऊन पोचलेले आहे.

  अशावेळी उमेद अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱया कर्मचाऱयांच्या पुनर्नियक्ती थांबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. रत्नागिरी जिल्हय़ासाठी करता एकूण 135 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 84 पदे भरली गेली आहेत. इतक्या कमी मनुष्यबळात काम करत असताना जिह्यातील 6 पदांवरील अधिकारी, कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणेच भविष्यात जिल्हय़ातील इतरांना सुद्धा कार्यमक्त केले जाईल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.अभियानामार्फत महिला सक्षमीकरणासाठी रक्कम रु. 185 कोटी 34 लाख इतका निधी गावपातळीवर समुदाय संस्थाना वितरीत करण्यात आला आहे.

  उमेद कर्मचारी यांना कमी केल्यास त्या निधीचे व्यवस्थापन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे गावपातळीवर वितरीत केलेल्या निधी मध्ये वित्तीय अनियमितता येऊ शकते. तसेच सद्यस्थितीत संस्था बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. उपजीविकेबाबत काम करणे सुरु आहे. त्यासाठी अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकता आहे. जर कर्मचारी नसतील तर उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही.

  उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब, गरजू कुटुंबांना स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या निर्णयामुळे या अभियानांतर्गत काम करत असणाऱया कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवा खंडित होणार आहेत. जे समूह किंवा संस्था या कर्मचारी, अधिकाऱयानी  मेहनत घेऊन, विविध समस्यांना सामोरे जात, अथक प्रयत्नाने उभे केले आहेत. त्या स्थितीत सोडून देणे, अधिकारी-कर्मचाऱयांना अनपेक्षितपणे थांबवणे, हे त्या समूहातीलासंस्थेतील सहभागी सदस्य, कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अन्यायकारक आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उमेद अंतर्गत रत्नागिरी जिह्यात काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

   उमेद अभियानातील पदभरती कायम ठेवणे, त्यांच्या पुनर्नियक्ती करणे, ही पदभरती बाह्य यंत्रणेकडून करण्यात येऊ नये 58 वयापर्यंत रोजगाराची हमी मिळावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱयांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी, मागणी व सोयीनुसार बदली मिळावी, अशा मागण्या उमेदच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱयांच्यावतीने शासनाकडे करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

Related Stories

देवगडमधील इंटरनेट सेवा बारा तासाहून अधिककाळ ठप्प

NIKHIL_N

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारा निवड

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्ह्यात नवा स्ट्रेन नाही – जिल्हाधिकारी

Patil_p

आत्मनिर्भरतेत सिंधुदुर्ग प्रथम क्रमांकावर असेल!

NIKHIL_N

जिह्यात चाचण्यांसह रूग्णसंख्येचाही विक्रम

Patil_p

माझा वेंगुर्ला संस्थेच्या पतंग महोत्सवास जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar