Tarun Bharat

उरी सैन्यतळावर विक्की कौशल

महान सशस्त्र दलांसोबत वेळ घालविणे सर्वात मोठा सन्मान

बॉलिवूडचा अभिनेता विक्की कौशलने अलिकडेच काश्मीरमधील उरी सैन्यतळाला भेट दिली आहे. याकरता भारतीय सैन्याने त्याला निमंत्रित केले होते. सैन्यतळावर आमंत्रित करण्यासाठी भारतीय सैन्याने मनपूर्वक आभार. अत्यंत उत्साही आणि अद्भूत प्रतिभा असलेल्या स्थानिक लोकांसोबत एक सुंदर दिवस घालविण्याची संधी दिली. आमच्या महान सशस्त्र दलांसोबत वेळ घालविणे माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे विक्कीने नमूद केले आहे. विक्कीची भारतीय सैनिक आणि स्थानिक लोकांसोबतची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.

उरी द सर्जिकल स्ट्राइक

विक्की कौशलच्या या छायाचित्रांनी त्याच्या चाहत्यांना ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर यांनीही छायाचित्रांवर कॉमेंट करत ‘आठवणींचा ढिग स्वतःसोबत आण’ असे म्हटले आहे. विक्कीचा ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो सर्वात मोठा हिट ठरला होता. चित्रपटातील दमदार अभिनयामुळे विक्कीला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित होता.

उधम सिंग यांच्यावरील जीवनपट

विक्की लवकरच उधम सिंग आणि सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिसून येणार आहे. या दोन्ही चित्रपटांसह ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ आणि करण जौहरच्या ‘तख्त’मध्ये विक्की दिसून येणार आहे.

Related Stories

ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर प्लॅनेट मराठीच्या सल्लागार पदी

Patil_p

माझ्या मनातील भारत कायम राहणार

Patil_p

पृथ्वीराज’मध्ये ऐतिहासिक भूमिकेत अक्षय

Patil_p

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

द बिग बुलचा टीझर प्रदर्शित

Patil_p

सागरिका म्युझिककडून नव्या रूपात श्रावणमासी हर्षमानसी

Patil_p