Tarun Bharat

उर्वशी रौतेला परतली सेटवर

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने स्वतःची आगामी वेबसीरिज ‘इन्स्पेक्टर अनिवाश’चे चित्रिकरण सुरू केले आहे. अलिकडेच तिने सेटवरील काही छायाचित्रे शेअर केली होती. यातून कोविड-19 च्या काळातील चित्रिकरणाचे स्वरुप समजू शकले होते. लॉकडाउननंतर चित्रिकरण करणे अत्यंत अवघड काम असल्याचे ती सांगते.

प्रॉडक्शन हाउसकडे एक नियमांचे पुस्तक असते, ज्याचे कसोशीने पालन करावे लागगते. यात नियमित स्वरुपात तापमान तपासले जाते आणि स्वॅब नमुने घेतले जातात. सोशल डिस्टंन्सिंगविषयी सातत्याने सांगण्यात येते असे तिने म्हटले आहे.

आमचा सेट कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरू नये याची काळजी निर्माते घेत आहेत. मास्क आणि शारीरिक अंतर अत्यंत सामान्य बाब आहे. याचबरोबर सेटवर सर्वांसाठी सॅनिटायजर उपलब्ध करण्यात आले आहे. कुणापासून 2 मीटर अंतरावरून बोलणे देखील अवघड असल्याचे ती सांगते.

महामारीत लसीकरणच उपाय आहे. वारंवार चाचण्या व्हाव्यात आणि साफसफाईची काळजी घेतली जावी असे तिने म्हटले आहे. इन्स्पेक्टर अविनाश वेबसीरिजमध्ये उर्वशीसोबत रणदीप हुड्डा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही वेबसीरिज पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनावर बेतलेली आहे. उर्वशीने अलिकडच्या काळात तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Related Stories

‘तेलगी’च्या भूमिकेत दिसणार गगन देव

Patil_p

न्यूयॉर्कच्या 6 मजली बिलबोर्डवर झळकली प्रियांका

Patil_p

शहीद शिरीषकुमार यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर

Patil_p

पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा

Patil_p

फराज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना कोरोना; कुटुंबालाही लागण

Tousif Mujawar