Tarun Bharat

उसगांवात भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत

Advertisements

वार्ताहर/ उसगांव

उसगांव जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपाचे उमेदवार उमाकांत महादेव गावडे व काँग्रेसचे उमेदवार मुकुंद विठू गावडे यांच्यात थेट लढत होणार आहे. हा मतदारसंघ एसटी म्हणजेच अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

जिल्हा पंचायत निवडणुक इतिहास व कौल

गोव्यात सन 2000 साली पहिली जिल्हा पंचायत निवडणूक झाली. त्यावेळी उसगांव भाग फोंडा विधानसभा मतदारसंघात येत होता. कुर्टी-खांडेपार पंचायत व उसगांव-गांजे पंचायत मिळून कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघाची रचना करण्यात आली होती. सन 2000च्या पहिल्या निवडणुकीत भाजपाचे नेते व कार्यकर्ते डॉ. सुदिन गांवकर हे विजयी झाले होते. सन 2005 च्या निवडणुकीत उसगांव येथील काँग्रेसचे तत्कालीन नेते व कार्यकर्ते तुळशीदास प्रभू हे विजयी झाले होते. 2012 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार संघ फेररचनेनुसार उसगांव-गांजे ग्रामपंचायत वाळपई विधानसभा मतदारसंघात सामील करण्यात आली. पण 2010 सालापासून मंत्री विश्वजीत राणे यांनी उसगांव भागात आपले कार्य सुरु केले होते. त्यावेळी ते काँग्रेसचे आमदार होते. 2010 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत विश्वजीत राणे यांनी समर्थन दिलेल्या दिपिका दत्ताराम प्रभू या निवडून आल्या तर 2015 च्या निवडणुकीत उसगांव-गांजे ग्रामपंचायतीचा समावेश असलेल्या उसगांव जिल्हा पंचायत निवडणुकीत विश्वजीत राणे यांनी समर्थन दिलेले ज्ञानेश्वर नाईक हे निवडून आले होते.

मागील चार निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता 2015 ची निवडणूक ही केवळ उसगांव पंचायतीचा समावेश असलेली उसगांव जिल्हा पंचायत निवडणूक होती. मात्र त्यापूर्वीच्या तिन्ही निवडणुकामध्ये विजयी उमेदवार हे उसगावचे रहिवासी होते. त्यापैकी एक भाजपा तर उर्वरित तीन हे काँग्रेसचे समर्थक होते.

उसगांव जिल्हा मतदारसंघात एकूण 11,344 मतदार आहेत. यापैकी 5630 पुरुष तर 5714 महिला मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणूक लढविणारे दोन्ही उमेदवार हे उसगावातील नाणूस वाडय़ावरील रहिवासी आहेत.

उमाकांत गावडे हे व्यावसायिक असून आपला राजकीय प्रवास समाजकार्याच्या ओढीने झाल्याचे ते सांगतात. मंत्री विश्वजीत राणे तसेच भाजपा कार्यकर्त्याच्या मदतीने आपण सहज बाजी मारणार असा विश्वासही ते व्यक्त करतात. काँग्रेसचे उमेदवार मुकुंद गावडे हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांचा अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी संबंध आहे. कुमेरी प्रश्नावर अनेकांना त्यांनी सहकार्य केले आहे. ही निवडणूक निश्चित जिंकू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

पेडणेत कॅसिनो विरोधात एल्गार, सहा ठराव मंजूर

Patil_p

बदली व नोटीस रद्द करा व दिव्यांग प्रमाणपत्र द्या

Patil_p

मधलामाज मांद्रेतील स्वयंघाषित लॉकडाऊन यशस्वी

Omkar B

खारेबांद येथील नादुरुस्त सुलभ शौचालयाची पाहणी

Amit Kulkarni

डय़ुरँडमध्ये एफसी गोवाचे जमशेदपूरवर पाच गोल; आर्मी ग्रीन बाद फेरीत

Amit Kulkarni

लुईझिन फालेरो आज तृणमुलमध्ये

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!