Tarun Bharat

उसगांव येथून 2 लाखांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त

पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांची धडक कारवाई

प्रतिनिधी /फोंडा

सिद्धेश्वरनगर तिस्क उसगांव येथील एका जनरल स्टोअरवर फोंडा पोलिसांनी छापा टाकून 100 किलो वजनाचा सुमारे 2 लाख किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. याप्रकरणी राजू देवर (46, उसगांव) या संशयिताला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई काल शुक्रवारी उशिरा रात्री करण्यात आली.

  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या साठय़ात गुटखा, सिगारेट, आणि सुमारे 100 किलो वजनाचा रू 2 लाख 10 हजार किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांना उसगांव भागात तंबाखूजन्य पदार्थाचे मोठया प्रमाणात वितरण होत असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सिद्धेश्वरनगर येथील जनरल स्टोअर्सवर बेकायदेशीरित्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना राजू याला फोंडा पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात आले. जनरल स्टोअरवर विविध ब्रेन्डच्या 100 किलो पेक्षा जास्त तंबाखूजन्य पदार्थ आढळले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितावर सार्वजनिक आरोग्य कायदा 1985 च्या कलम 87 (अ) खाली गुन्हा नोंद केला आहे. फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज काणकोणकर, उपनिरीक्षक आदित्य वेळीप, हवालदार केदारनाथ जल्मी, वंदेश सतरकर, कॉन्सटेबल अमेय गोसावी, आदिनाथ व उमेश यांनी ही कारवाई केली.

Related Stories

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सहावर

Patil_p

राष्ट्रीय स्वयंसेवकाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य पं. दिनदयाळ उपाध्ये यांनी केले- श्रीपाद नाईक

Patil_p

जलस्रोत खात्यामार्फत राज्यातील 40 तळय़ांचे पुनरुज्जीवन करणार

Amit Kulkarni

काणकोणच्या टॅक्सीचालकांचा डिजिटल मीटर बसविण्यास नकार

Amit Kulkarni

पावसाने झोडपले, दिवसभरात 4.5 इंचांची नोंद

Omkar B

म्हापशात क्वारंटाईन असणाऱया परप्रांतियांचा गोंधळ

Omkar B