Tarun Bharat

उसने पैसे घेतलेल्या मानसिक तणावातून महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसात गुन्हा दाखल

शिरोळ / प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे महिलेचा नांदणी येथे मृतदेह मिळून आला. मिना महावीर मगदूम (वय ५५, रा. शाहूनगर महावीर चौक) असे तिचे नाव असून शवविच्छेदनानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद शिरोळ पोलीसांत झाली आहे.

पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, खर्चासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी काही लोकांकडून, बचत गटातून मिना मगदूम यांनी उसने पैसे घेतलेले होते. त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. तीन दिवसापूर्वी कोणास काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. आज शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास नांदणी येथाील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक असलेल्या मोकळ्या जागेत त्या मृतावस्थेत मिळून आल्या. याबाबतची वर्दी अभिषेक मगदूम यांनी पोलिसांत दिली.

Related Stories

जी.डी.सी.अॅण्ड ए परीक्षा 23 ऑक्टोबर पासून

Archana Banage

उदगाव ग्रामसभा तहकूब; नागरिक आक्रमक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : दूध दरवाढीसाठी भाजपने महामार्ग रोखला

Archana Banage

पंजाबच्या माजी काँग्रेस प्रमुखाचा पक्षाला रामराम

Archana Banage

गुलालाचे शरीर रक्ताने माखले

datta jadhav

कृषी विधेयकावरून हिंसक वळण ; इंडिया गेटजवळ पेटविला ट्रॅक्टर

Tousif Mujawar