Tarun Bharat

उस्मानाबाद जिल्ह्यात 133 पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर

प्रतिनिधी / उस्मानाबाद

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसें दिवस वाढत असून सध्या प्रशासकीय यंत्रणाही सध्या चांगलीच कामाला लागली आहे. प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक कोरोनाच्या बाबतीत गंभीर झालेले नाहीत हे वाढत असलेल्या रूग्णांवरून दिसून येत आहे.
झाला असून दि. 30 रोजी उस्मानाबादेत 67, उमरगा येथे 32, तुळजापूर 16, कळंब 3, परंड्यात 2 , लोहारा 1, भूम 2 व वाशीत 09 असे एकूण 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या 991 वर पोहचली असून उपचारानंतर बरे होवून घरी गेलेले रुग्ण 482 आहेत. 461 रुग्ण उपचार घेत आहेत तर 48 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत 466 स्वॅबचे नमुने चाचणीसाठी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्रात पाठवीणेत आले होते. त्यानुसार 452 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 133 पॉझिटिव्ह, 287 निगेटिव्ह, 32 इनक्न्वलुजीव, 14 जणांचा अहवाल प्रलंबीत आहे. तर अ‍ॅन्टी रॅपीड टेस्ट मध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही . त्यामुळे रुग्णाची संख्या 991 वर पोहचली आहे. सदर अहवाल गुरूवार दि. 30 दुपारी 1.58 वाजणेच्या सुमारास प्राप्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद एकच खळबळ उडाली आहे .

Related Stories

Ratnagiri : शिवशाही आणि इर्टिगा कारच्या अपघातात दोघा चाकरमान्यांचा मृत्यू

Abhijeet Khandekar

अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

datta jadhav

छत्रपती शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?; खासदार उदयनराजेंचा संताप

Archana Banage

असले वाचाळवीर काय पक्षनिष्ठा शिकवणार?

Patil_p

सांगली : संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Archana Banage

आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू? दीपक केसरकरांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट

Rahul Gadkar