Tarun Bharat

उस्मानाबाद : लाच स्वीकारताना महावितरणच्या प्रतिनिधीसह साथीदारास अटक

Advertisements

प्रतिनिधी / उस्मानाबाद


महावितरण कडून कंत्राटी कामगारांच्या नियुक्ती करण्यासाठी मे. डी. एम.दहिफळे,परळी, जि. बीड यांना एक वर्षाचे कंत्राट मिळालेले आहे.
सदर कंपनीचे प्रतिनिधी अमोल हनुमंतराव सूर्यवंशी याना ह्या कामासाठी कंपनीने नेमलेले आहे.यातील तक्रारदार यांचा यंत्रचालक म्हणून १५/१०/२०२० रोजी कालावधी संपल्याने कामावरून कमी करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना नवीन एक वर्षासाठी नियुक्तीचे आदेश देण्यासाठी अमोल सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष १०,०००/- रुपयांची मागणी करून ५०००/- रुपये लागलीच व उर्वरित ५०००/- रुपये पहिला पगार झाल्यावर स्वीकारण्याचे मान्य केले.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांचेशी सम्पर्क साधला.त्यांचे तक्रारी वरून शहानिशा केली.

आरोपी अमोल हनुमंतराव सूर्यवंशी, रा.तांबरी विभाग,उस्मानाबाद याने आरोपी इसम नामे फुलचंद ललित फंड रा.बार्शी नाका, उस्मानाबाद याचे मार्फत तक्रारदाराकडून ५०००/-रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंबंधाने पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पो.ना. जाधव, मारकड, पो.कॉ.बेळे, डोके, तावस्कर, आचार्य यांनी पार पाडली.

Related Stories

राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी अभविप कार्यालयाला फासले काळे

prashant_c

34 हजार 184 कोवीडशिल्ड डोस सोलापुरात दाखल

Archana Banage

सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सरासरी 68 टक्के मतदान

Archana Banage

सोलापूर बाजार समिती नटणार हिरवाईने

Archana Banage

CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यात पक्षबांधणीला सुरुवात; महिला आघाडीला मिळणार संधी

Abhijeet Khandekar

उद्योगाबरोबरच कृषी क्षेत्रही आपलं प्राधान्य : उद्धव ठाकरे

prashant_c
error: Content is protected !!