Tarun Bharat

उद्योगपती रतन टाटा पीएम केअर्स फंडचे ट्रस्टी

Advertisements

सल्लागार मंडळावर सुधा मूर्ती ः पंतप्रधान कार्यालयाची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या नवीन विश्वस्तांची (ट्रस्टी) नावे बुधवारी जाहीर करण्यात आली. उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, लोकसभेच्या माजी उपसभापती करिया मुंडा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शहा यांना विश्वस्त करण्यात आले आहे. विश्वस्तांनंतर पीएम केअर्स फंडमध्ये एक सल्लागार मंडळही स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. भारताचे माजी कॅग राजीव महषी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती, टीच फॉर इंडियाचे सह-संस्थापक आणि इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांचा त्यात समावेश आहे.

पीएम केअर फंडच्या विश्वस्तांमध्ये रतन टाटा यांच्यासोबतच नामांकित व्यक्तींचीही विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत सर्व नवनियुक्त विश्वस्तांचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पीएम केअर फंडच्या माध्यमातून करण्यात येणाऱया वेगवेगळय़ा कामांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला रतन टाटादेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या एका दिवसानंतर ही घोषणा करण्यात आली. या बैठकीला अमित शहा आणि निर्मला सीतारामन हेसुद्धा उपस्थित होते.

‘पीएम केअर’मध्ये सध्या 10990.17 कोटी रुपये

28 मार्च 2020 रोजी पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंड सुरू करण्यात आला. कोविड-19 सारख्या आपत्कालात तसेच भविष्यातही लाभार्थींना दिलासा देणे हा या निधीद्वारे सरकारचा उद्देश आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार, 2020-21 दरम्यान पीएम केअर फंड अंतर्गत एकूण 7,031.99 कोटी रुपये जमा झाले. सध्या या फंडमधील एकूण शिल्लक 10990.17 कोटी रुपये आहे. हा निधी पूर्णपणे व्यक्ती किंवा संस्थांच्या ऐच्छिक साहाय्याने कार्य करतो. पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असून त्यात भरलेली प्रत्येक रक्कम प्राप्तिकरातून पूर्णपणे मुक्त आहे.

Related Stories

‘अग्नी-प्राईम’चे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ

Amit Kulkarni

भारताच्या प्रतिहल्ल्यात 2 पाकिस्तानी सैनिक ठार

Omkar B

घरगुती सिलिंडरची किंमत जैसे थे

Patil_p

‘खेला होबे दिवस’ साजरा करणार ममता सरकार

Patil_p

मथुरा कोर्टात आज कृष्ण जन्मभूमी प्रकरणी सुनावणी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!