Tarun Bharat

ऊंट गाडीवर पहिली मोबाइल लायब्रेरी

वाळूच्या टेकडय़ांवर मुलांचा भरतोय वर्ग

राजस्थानच्या दुर्गम गावांमधील मुलांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तेथे ऊंट गाडय़ांवर मोबाइल लायब्रेरी सुरु करण्यात आली आहे. जोधपूर जिल्हय़ातील 30 गावांमध्ये याची सुरुवात झाली आहे. पहिल्यावेळी या लायब्रेरीला फुगे आणि फुलांनी सजवून गावांपर्यंत पोहोचविण्यात आले. ही राज्यातील पहिली मोबाइल लायब्रेरी असून जी ऊंट गाडीवर सुरू झाली आहे.

गावांमध्ये पोहोचल्यावर मुलांना याविषयी सांगण्यात आल्यावर त्यांच्या चेहऱयावर हास्य उमटले आहे. या मुलांना लायब्रेरीतील पुस्तकांविषयी माहिती देण्यात आली. रुम टू रीड आणि जिल्हा प्रशासनाकडून चालविल्या जाणाऱया आंतरराष्ट्रीय रीडिंग कँपेन 2021 अंतर्गत ही मोबाइल लायब्रेरी सुरू करण्यात आली आहे.

कोरोना संकटामुळे या मुलांच्या शाळा बंद आहेत, वाळवंटी भाग असल्याने खासगी शाळांचे प्रमाण तेथे अधिक नाही. याचमुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणही घेता येत नव्हते. मुलांची हीच समस्या पाहता मोबाइल लायब्रेरीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

लायब्रेरीत 1500 पुस्तके

ऊंट गाडी 8 सप्टेंबरपर्यंत ओसिया प्रांतातील गावांमध्ये फिरणार आहे. या लायब्रेरीत सुमारे 1500 पुस्तके असून यात सर्वाधिक कथा आणि चित्रकलेशी संबंधित आहेत. या लायब्रेरीत एक स्टोरी टेलर (कथा सांगणारा) देखील असेल, जो मुलांना गोष्टी सांगणार आहे. देशभरातील 9 राज्यांमध्ये या संस्थेची मोहीम सुरु आहे.

लायब्रेरीची थीम

ही मोबाइल लायब्रेरी जोधपूर जिल्हय़ातील 30 गावांच्या शाळांमध्ये जाणार आहे. रुम टू रीड मोहिमेच्या अंतर्गत ‘नहे रुकेंगे नन्हे कदम, घर पर भी सीखेंगे हम’, ‘मैं जहां सीखना वहां’, ‘इंडिया गेट्स रीडिंग ऍट होम’,ची थीम ठेवण्यात आली आहे. ही लायबेरी शाळांमध्ये पुस्तके ठेवून येते. एखाद्या भागात शिक्षक नसल्यास पालकांनी मुलांना पुस्तके वाचून विषय समजावून देणे अभिप्रेत आहे.

Related Stories

पानाची किंमत किती असेल?

Patil_p

‘या’ निर्धाराला सलाम

Patil_p

दसऱ्यासाठी देवतांच्या मूर्तीना कलाकुसरीच्या वस्त्रांचा साज!

Tousif Mujawar

पाळीव श्वानांसाठी 53 लाखांचा बंगला

Patil_p

सिनेसम्राट दिलीपकुमार यांनी कोल्हापूरवासीयांबद्दल काढले होते ”हे” गौरवोद्गार

Archana Banage

वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलचे खास डूडल!

Tousif Mujawar