Tarun Bharat

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर


मुंबई \ ऑनलाईन टीम

कोकणातील रत्नागिरी, चिपळून या नुकसानग्रस्त भागातील आढावा घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज गुरूवारी या परिसराचा दौरा करणार आहेत. यावेळी नितीन राऊत या दौऱ्यात वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत.

कोकणात मोठ्या प्रमाणात महापुराने आणि अतिवृष्टीनी मोठं नुकसान झालं आहे. त्या भागात जीवितहानीही झाली आहे. अजूनही त्या भागात पाऊस पडतो आहे, हवामान खात्याने अजून चार-पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र लोकांच्या घरापर्यंत वीज कशी नेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच आजचा दौरा आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

लोकांच्या घरापर्यंत वीज कशी द्यावी, मदत कशी पोहोचवावी यासाठी हा दौरा आहे. लोकांची सेवा करणे, ब्लॅंकेट, खाण्याच्या गोष्टी पुरवणे आणि सोलर लाईट देण्याचा कार्यक्रम आहे. बऱ्याच गोष्टी 80 टक्के पूर्ण केल्या आहेत, 20 टक्के बाकी आहेत. कर्मचाऱ्यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. आज कोकणात जाऊन पाहणी करणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

Related Stories

‘हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत’

Archana Banage

कोविड केअर केंद्रानुषंगाने जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

NIKHIL_N

चिपळुणात मारहाण प्रकरणी 21जणांवर गुन्हे

Patil_p

दाणेलीनजिक वाहनाच्या धडकेत गवा ठार

NIKHIL_N

शाहुवाडी तालुक्यातील भोसलेवाडी-कडवे बंधारा खचला

Archana Banage

सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर वरुण गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

Archana Banage
error: Content is protected !!