Tarun Bharat

ऊस ट्रॅक्टर दुचाकी अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

प्रतिनिधी / वारणानगर


वारणानगर येथील सदाशिव भीमराव महाजन ( वय- ७० ) हे गावी मांगले ता. शिराळा येथे जाताना मांगलेजवळच ऊसाचा रिकामा ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना कोडोली येथे उपचारासाठी आणत असताना त्याचे निधन झाले.
श्री महाजन रयत शिक्षण संस्थेसंस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक होते. वारणानगर ता. पन्हाळा येथील निवृत्ती कॉलनीमध्ये राहत होते शनिवारी सव्वातीन वाजता मोटरसायकल वरून मांगले गावाकडे निघाले होते.

त्यावेळी चिकुर्डेकडे भरधाव येणाऱ्या ट्रॅकटरने त्यांना समोरून धडक दिली. त्यामध्ये महाजन गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्राथमिक उपचारासाठी मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहण्यात आले. मात्र ट्रॅक्टरच्या चाकाखाली महाजन यांचे दोन्ही पाय अडकल्यामुळे मोठी जखम झाली होती. रक्तप्रवाह ही मोठ्या प्रमाणात होत होता. त्यानंतर त्यांना वारणानगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मांगले गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

गुडे गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल

Archana Banage

हातात तलवारी,बंदुका घेत सोशलमीडियावर स्टेटस,दोघांना अटक

Archana Banage

कोल्हापूर : शिवसेनेचा कृषी विधेयका विरोधात बैलगाडी मोर्चा

Archana Banage

अब्दुललाटचा जिनेन्द्र मोटॉक्रॉसमध्ये देशात अव्वल

Archana Banage

काय आहे कोल्हापुरातील पावसाची परिस्थिती? वाचा एका क्लिकवर

Rahul Gadkar

श्रीकृष्ण ग्लुकोज कारखान्याची जमिन विकण्याचा डाव

Abhijeet Khandekar