Tarun Bharat

ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची दमदार सुरुवात

बावणेच्या अर्धशतकासह महाराष्ट्राच्या 2 बाद 219 धावा

पुणे /  प्रतिनिधी   

महाराष्ट्रविरूद्ध ओडिसा यांच्यात गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचे नाबाद शतक आणि कर्णधार अंकित बावणे याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने बुधवारी दुसऱया दिवस अखेर 2 बाद 219 धावांसह दमदार सुरुवात केली. या आधी  ओडिसाचा पहिला डाव 293 धावांत संपुष्टात आला. त्यात राजेश धुपेर याने शतकी खेळी केली.

ओडिसाने कालच्या 220 धावांपासून आज पुढे खेळण्यास सुरूवात केली. ओडिसा आज मोठी धावसंख्या उभी करेल, असे वाटत असताना महाराष्ट्राच्या अक्षय पालकर, सत्यजित बच्छाव, मुकेश चौधरी अहणि मनोज इंगळे यांनी ओडिसाला 293 धावांवर रोखले. यात अक्षयने 29 षटकांत 81 धावांच्या मोबदल्यात 4 गडी, सत्यजित बच्छाव आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 बळी, तर मनोजने 1 गडी बाद केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या डावाची सुरूवात खराब झाली, तरी ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार अंकित बावणे यांनी महाराष्ट्राचा डाव सावरला. यात ऋतुराज गायकवाडने 181 चेंडूत 9 चौकार 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 110 धावा, तर अंकित बावणेने 184 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. त्यांच्या खेळीमुळे महाराष्ट्राने आजच्या दिवसअखेर 2 बाद 219 धावांपर्यंत मजल मारली आहे.

Related Stories

क्रीडाविश्वातील सर्वोच्च पुरस्काराने सचिन तेंडुलकरचा गौरव

tarunbharat

भारतीय महिला लिग स्पर्धेत इस्ट बंगालचे पदार्पण

Patil_p

डिसेंबरमध्ये लंका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

Patil_p

राहुलने यष्टीरक्षक – फलंदाज म्हणून स्थान निश्चित करावे

Patil_p

यॉर्कशायरमध्ये पुजाराचाही वर्णद्वेष!

Patil_p

मोटो जीपीच्या शर्यती रद्द

Patil_p
error: Content is protected !!