Tarun Bharat

ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय फायनलमध्ये, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स क्वालिफायर फेरीत

Advertisements

बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित सहाव्या बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या क्वालिफायर सामन्यात ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाने अर्जुनवीर श्री साई सोशल संघाचा 44 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर एलिमिनेटर सामन्यात साई स्पोर्ट्स हुबळी संघाने सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना संघाचा 5 गडय़ांनी पराभव करून क्वालिफायर फेरीत प्रवेश केला. माजिद मकानदार (ऍक्सेस), डॉमनिक फर्नांडिस (साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखान्यावर रविवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआयने 12 षटकात 5 बाद 122 धावा केल्या. माजिद मकानदारने 4 षटकार व 2 चौकारासह 49, सुशांत कोवाडकरने 1 षटकार 3 चौकारासह 21, रवी उकलीने 2 षटकार 1 चौकारासह 20 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे विजयकुमार पाटीलने 6 धावात 2, अलगौडा पाटीलने 25 धावात 2, अर्जुन पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुनवीर साई सोशल संघाचा डाव 8.3 षटकात सर्व बाद 78 धावातच आटोपला. 2 बाद 62 अशी चांगली स्थिती असताना ताहीर सराफने 4 गडी बाद केल्यामुळे अर्जुनवीर संघ 78 धावात आटोपला. त्यात सुजय सातेरीने 5 चौकारासह 30, सुदीप सातेरीने 1 षटकार 1 चौकारासह 15, वैभव कुरुबागीने 1 चौकारासह 12 धावा केल्या. ऍक्सेसतर्फे ताहीर सराफने 10 धावात 4, तर सुशांत कोवाडकर, जिनत एबीएम, दिनेश होनगेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुपारी खेळविण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना संघाने 19.2 षटकात सर्व बाद 145 धावा केल्या. केतज कोल्हापुरेने 3 षटकार 7 चौकारासह 57, शिवप्रकाश हिरेमठने 3 षटकार 3 चौकारासह 42, रोहित पाटीलने 12 धावा केल्या. साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सतर्फे डॉमनिक फर्नांडिसने 10 धावात 3, किरण तारळेकरने 20 धावात 2 तर राजेंद्र दंगण्णावरने 37 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 19.2 षटकात 5 बाद 148 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. यश कळसण्णावरने 6 चौकारासह 44, डॉमनिक फर्नांडिसने 1 षटकार 2 चौकारासह नाबाद 33, सर्फराज मुल्लाने 25 तर रोहित पोरवालने 18 धावा केल्या. सुपर एक्स्प्रेस जिमखानातर्फे रोहित पाटीलने 28 धावात 2 तर दीपक राक्षे, पुरूषोत्तम जखबाळ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रोहन जवळी, महादेव चौगुले, लक्ष्मण शेरापुरी, चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार माजिद मकानदार, इम्पॅक्ट खेळाडू ताहिर सराफ, उत्कृष्ट झेल केदार उसुलकर तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुण्या आरती पोरवाल, अमृता चौगुले, रवी चौगुले, कुलदीप आपटेकर यांच्या हस्ते सामनावीर, डॉमनिक फर्नांडिस, इम्पॅक्ट खेळाडू केतज कोल्हापुरे, सर्वाधिक षटकार शिवप्रकाश हिरेमठ, उत्कृष्ट झेल विठ्ठल हबिब यांना चषक देवून गौरविण्यात आले.

सोमवारी दुसरा क्वालिफायर ः अर्जुनवीर श्री साई सोशल वि. साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स सकाळी
9 वा.

Related Stories

विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

मल्ल सुमित मलिक दुसऱया चाचणीसाठी राजी

Patil_p

नव्याने प्रारंभासाठी चेन्नई, लखनौ महत्त्वाकांक्षी

Patil_p

दुखापतग्रस्त मार्क वूडच्या उपलब्धतेबद्दल साशंकता

Patil_p

बाला देवी, मनीषा यांना एआयएफएफचे पुरस्कार

Patil_p

‘जखमी’ वाघांची संस्मरणीय झुंज

Patil_p
error: Content is protected !!