Tarun Bharat

ऍगटच्या विजयाने स्पेन अंतिम फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ सिडनी

येथे सुरू असलेल्या एटीपी चषक सांघिक पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत शुक्रवारी रॉबर्टो ऍगटच्या शानदार विजयामुळे स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ऍगटने पोलंडच्या हुरकाझचा पराभव केला.

शुक्रवारी स्पेन आणि पोलंड यांच्यातील झालेल्या लढतीत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या रॉबर्टो ऍगटने पोलंडच्या हुरकाझचा 7-6 (8-6), 2-6, 7-6 (7-5) असा पराभव केला. या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात बुस्टाने पोलंडच्या झिलेनेस्कीचा 6-2, 6-1 असा पराभव करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर ऍगटने दुसरा एकेरी सामना जिंकून स्पेनची आघाडी वाढविली. कोरोनाची बाधा झाल्याने पोलंडच्या कॅमिल मॅजेपेझला माघार घ्यावी लागल्याने स्पेनने ही लढत एकतर्फी जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता या स्पर्धेत रशिया आणि कॅनडा यांच्यात उपांत्य फेरीची दुसरी लढत होणार आहे. या लढतीतील विजयी संघाबरोबर स्पेनची जेतेपदासाठी गाठ पडेल.

Related Stories

क्विटोव्हा, थिएम, सीगमंड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मिशेल-ब्लंडेलने न्यूझीलंडचा डाव सावरला

Patil_p

दिल्ली बुल्स संघाची विजयी सलामी

Patil_p

पाटणा पायरेट्स यू मुम्बाला धक्का

Patil_p

केएल राहुलला रोखण्याची पंजाब किंग्सची महत्त्वाकांक्षा

Amit Kulkarni

सुशीला देवी अंतिम फेरीत, विजय कांस्यपदकासाठी लढणार

Patil_p
error: Content is protected !!