Tarun Bharat

ऍडलेड स्पर्धेत बार्टी विजेती

वृत्तसंस्था/ ऍडलेड

डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या ऍडलेड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीने एकेरीचे जेतेपद मिळविताना रिबेकिनाचा पराभव केला.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात टॉप सीडेड बार्टीने सातव्या मानांकित रिबेकिनाचा केवळ 64 मिनिटात 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. बार्टीचे या स्पर्धेतील दुसरे जेतेपद आहे. तीन वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. 17 जानेवारीपासून मेलबर्नमध्ये सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा होती.

Related Stories

युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचाही कोव्हिडविरुद्ध लढय़ात पुढाकार

Patil_p

अर्जेंटिना-पराग्वे सामना बरोबरीत

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर निसटता विजय

Patil_p

मॅडिसन किजकडून केनिन पराभूत

Patil_p

मल्ल रवी दाहियाला रौप्यपदक

Amit Kulkarni

रोनाल्डोला कोरोनाची लागण

Patil_p