Tarun Bharat

ऍथर एनर्जीने थांबविले पहिल्या मॉडेलचे उत्पादन

Advertisements

नवी दिल्ली 

 ऍथर एनर्जीने आपली पहिली स्कूटर ‘ऍथर 450’ या मॉडेलची विक्री बेंगळूर आणि चेन्नई येथून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काळात या मॉडेलचे उत्पादन बंद करुन नवीन मॉडेल बाजारात आणण्याची कंपनीची तयारी आहे. यासोबतच ऍथर एनर्जी वेगाने विकास करण्यासाठीची योजना तयार करीत असल्याचेही सांगण्यात आले आहे. यात सचिन बंसल आणि हिरो मोटोकॉर्पच्या नेतृत्वात सीरीज-डी फंडिगची नवीन योजना समाविष्ट आहे. 

ऍथर 450 कडून ऍथर 450 एक्स आणि ऍथर 450 प्लस यांना रिप्लेस करण्यात येणार आहे. या स्कूटरची एकाच प्लॅटफॉर्मवर निर्मिती होणार आहे. यामध्ये विशेष हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या सुविधा राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ऍथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी यावेळी म्हटले आहे, की आमच्या पहिल्या मॉडेलच्या तंत्रज्ञनाचा उपयोग नव्या मॉडेलमध्यही आहे.

Related Stories

होंडाच्या सीबीआर-600चे सादरीकरण 21 ऑगस्ट रोजी

Patil_p

बजाज ऑटोने ‘डॉमीनर’च्या किंमती घटवल्या

Patil_p

डुकाटीचे मॉन्स्टरसाठीचे प्री-बुकिंग सुरू

Patil_p

पुढील वर्षात होंडा मोटारसायकल उतरणार इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात

Patil_p

इलेक्ट्रीक बस, निर्यातीवर अशोक लेलँडचे लक्ष

Patil_p

नवी वेगनार बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!