Tarun Bharat

ऍथलिट दुखापत व्यवस्थापन पद्धतीचे उद्घाटन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रशिक्षण सराव तसेच स्पर्धेवेळी ऍथलिट्सना होणाऱया दुखापतीवर जागतिक दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील इलाईट गटातील ऍथलिट्सना दुखापतीवर केल्या जाणाऱया उपचार व्यवस्थापन पद्धतीचे उद्घाटन शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी केले.

देशातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना स्पर्धेवेळी तसेच सराव करताना अनेक गंभीर दुखापती होत असल्याचे आढळून आले आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या या दुखापतीच्या स्वरुपाचे निदान शक्य तो लवकरात लवकर करणे आणि त्यांच्यावर उच्चस्तरीय वैद्यकीय इलाजाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या नव्या सुविधेचे उद्घाटन शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजू यांनी केले. ही सुविधा भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ आणि देशातील आघाडीचे वैद्यकीय तज्ञ यांच्या संयुक्त सहकार्याने अंमलात आणली जाणार आहे. विविध खेळाडूंच्या दुखापतीची माहिती तातडीने उपलब्ध होण्यासाठी आता ऑनलाईनद्वारे ऍथलिट मॅनेजमेंट सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. देशाचा क्रीडा दर्जा सुधारण्यासाठी आधुनिक सुविधा त्याचप्रमाणे खेळाडूंच्या तंदुरुस्तीला पहिले प्राधान्य दिले जात असल्याने यापुढे अशा विविध योजना अंमलात आणल्या जातील, असे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

हॉलंडचा अष्टपैलू डुश्चे क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

इलावेनिल, बजरंग वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू

Omkar B

इंग्लंड 4 बाद 192

Patil_p

बायो-बबल क्रिकेटपटूंसाठी न संपणारे दुःस्वप्न – मॅक्सवेल

Patil_p

‘जैस्वाल-चहल शो’मुळे राजस्थान रॉयल्स विजयपथावर

Patil_p

माझ्या नावाचा वापर अपप्रचारासाठी नको

Amit Kulkarni