Tarun Bharat

‘ऍन्टिजॅन’ चाचणी सुरू

अहवाल मिळतो 45 मिनिटांत : लवकरच आरोग्य केंद्रांमध्येही सुरु होणार : पणजी, मडगाव, वास्कोत खासगी ‘आयसीयु’ उपलब्ध

प्रतिनिधी / पणजी

गोव्यात शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचे बळी गेल्याने आतापर्यंतचे एकूण बळी 45 झाले आहेत.  काल 209 नवीन कोरोनाबाधित सापडले तर 206 जण बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले. आता 1657 जण सक्रिय कोरोना रुग्ण असून चाचणी अहवाल येण्यास उशिर लागतो म्हणून ‘ऍन्टिजॅन’ चाचणी दोन्ही जिल्हा, उपजिल्हा सरकारी हॉस्पिटलात सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य सचिव निला मोहनन यांनी दिली.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, 190 जणांनी होम आयसोलेशनसाठी अर्ज केले आहेत. त्यातील 24 अर्ज फेटाळण्यात आले असून 20 अर्ज प्रलंबित आहेत तर उर्वरित अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संबंधित आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱयांनी शिफारस केल्यानंतरच त्या रुग्णांना मान्यता देण्यात येते. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी त्या शिफारशीनंतच होम आयसोलेशनसाठी मंजुरी देतात, असे मोहनन यांनी स्पष्ट केले. रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन तो शिष्टाचारात बसतो की नाही याची खात्री आरोग्य केंद्राकडून झाल्यानंतर ती मान्यता मिळते, असे त्या म्हणाल्या.

यापुढे आरोग्य केंद्रातही चाचण्या

हॉस्पिसियो, आझिलो तसेच फोंडा उपजिल्हा आणि गोमेकॉत ऍन्टिजॅन चाचणी सुरू करण्यात आल्या आहेत. त्या चाचण्या यापुढे आरोग्य केंद्रातही सुरू करण्याचा इरादा आहे. त्या चाचणीचा निकाल 45 मिनिटात मिळतो. त्याचा खर्च मात्र रु. 2000 असून तो चाचणी करणाऱया व्यक्तीस करावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तीन खासगी इस्पितळात 20 टक्के बेड (आयसीयू) कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून मणिपाल-पणजी, व्हिक्टर अपोलो-मडगाव व एसएमआरसी-वास्को यांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय 2 खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.

आतापर्यंत 4211 जण कोरोनामुक्त

आरोग्य खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 5993 जणांना कोरोनाची लागण झाली असून 4211 जण त्यातून बरे झाले आहे. संशयित रुग्ण म्हणून काल 54 जणांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले असून विविध रेसिडेन्सी हॉटेल्समध्ये 63 जण क्वारंटाईन आहेत. 4019 जणांचे अहवाल प्रलंबित असून विविध मार्गाने गोव्यात आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

आमदार क्लाफासियो डायस पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस हे पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. ते यापूर्वी मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सुमारे महिनाभर उपचार घेत होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह झाल्याने त्यांना तेथून गोमेकॉत पाठवण्यात आले होते. दरम्यान गोमेकॉत त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह मिळाल्याने त्यांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोग्य खाते व गोमेकॉत खळबळ माजली असून ते पुन्हा पॉझिटिव्ह कसे झाले याचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

आरोग्य केंद्रामधील सक्रिय रुग्णांची आकडेवारी

सांखळी 39

वाळपई 13

म्हापसा 51

पणजी 78

कांदोळी 42

कोलवाळ 37

चिंबल 81

मडगाव 112

वास्को 383

बाळ्ळी 33

कुठ्ठाळी 347

कुडतरी 37

लोटली 40

धारबांदोडा 34

फोंडा 92

नावेली 27

हळदोणा 10

बेतकी 12

खोर्ली 10

शिवोली 15

पर्वरी 21

कुडचडे 10

कासावली 19

मडकई 17

शिरोडा 18

गोव्यात 31 जुलैपर्यंत कोरोनाबाधित        – 5993

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                      – 4211

उपचार घेणारे सक्रिय रुग्ण                      – 1657

31 जुलै रोजीचे नवे रुग्ण             – 209

31 जुलै रोजी बरे झालेले रुग्ण                  – 206

31 जुलै रोजी झालेले मृत्यू                       – 2       

आतापर्यंतचे एकूण मृत्यू              – 45

Related Stories

गोव्यात सण, उत्सवकाळात ध्वनी मर्यादेच्या वेळेत वाढ

Amit Kulkarni

कर्नाटकातील वाहनांना पोळे चेकनाक्यावरून प्रवेश देऊ नये

Omkar B

जि.पंचायतीसाठी बेतकी खांडोळय़ात रंगणार तिरंगी लढत

Omkar B

मिरामार किनार्‍यावर कचरा काढण्याचे काम मंद गतीने

GAURESH SATTARKAR

दक्षिण गोव्याला जबरदस्त तडाखा

Amit Kulkarni

दिवाळी अंकाला तरूणाईपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक

Patil_p