Tarun Bharat

ऍन्टीबॉडीज तपासण्यासाठी बेळगावात होणार सर्वेक्षण

प्रतिनिधी / बेळगाव :

कोरोना महामारीचा फैलाव वाढत चालला आहे. बेळगावसारख्या जिल्हय़ात रोज 400 ते 500 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. तर राज्यात रोज 9 ते 10 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव समुदायात झाला आहे का? याची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

एक-दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण होणार असून बेळगावातील 485 सुदृढ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. स्वॅबबरोबरच  रक्ताच्या नमुन्यांचीही तपासणी होणार आहे. समुदायात ऍन्टीबॉडीज (प्रतिजैविके) तयार झाली आहेत का? हे तपासण्यासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे.

रॅपीड तपासणी, आरटीपीसीआर व रक्ताचे नमुने तपासण्यासाठी बेंगळूरला पाठविण्यात येणार आहे. 18 वर्षांवरील सुदृढ नागरिकांची तपासणीसाठी निवड होणार असून त्यांच्या तपासणीतून समुदायात कोरोनाचा फैलाव कितपत झाला आहे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी ऍन्टीबॉडीज शरीरात तयार झाले आहेत का? याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

लवकरच तपासणीच्या नियमात आणखी बदल होणार आहेत. स्वॅब तपासणीची सक्ती हटविण्यासाठी हालचाली सुरू असून ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येतात. जे स्वयंप्रेरणेने तपासणीसाठी पुढे येतात अशा नागरिकांचीच स्वॅब तपासणी होणार आहे. मात्र 60 वर्षांवरील ज्ये÷ नागरिकांची तपासणीची सक्ती कायम राहणार आहे. यासंबंधी अद्याप निर्णय झाला नसून लवकरच सरकारी निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  

Related Stories

तालुक्मयात पहिला श्रावण सोमवार साधेपणाने

Patil_p

पंच रॉयस्टन जेम्स यांचे नव्या नियमावलीबद्दल क्रीडापटूंना मार्गदर्शन

Amit Kulkarni

कपिलेश्वर मंदिरात शिवपिंडीला 1001 आंब्यांची आरास

Amit Kulkarni

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 74 वर

Omkar B

वटपौर्णिमेसाठी बाजारपेठ बहरली

Patil_p

ऍड.सुधीर चक्हाणांचा कंग्राळी ग्रामस्थांतर्फे सत्कार

Amit Kulkarni