Tarun Bharat

ऍन्सी सोजनला दोन सुवर्णपदके

Advertisements

वृत्तसंस्था /गुवाहाटी :

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱया दिवशी ट्रक अँड फील्ड क्रीडा प्रकारात केरळच्या ऍन्सी सोजनने 21 वर्षाखालील वयोगटात दोन सुवर्ण पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यू-21 महिलांच्या लांब उडीमध्ये सोजनने 6.36 मी. उडी घेत सुवर्ण मिळविल्यानंतर तिने 100 मी. धावण्याच्या शर्यतीतही 12.21 सेकंद अवधी घेत सुवर्ण पटकावले. 18 वर्षीय सोजनने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना स्पर्धाविक्रमही मोडित काढला. याशिवाय यू-20 मधील 6.30 मी.चा राष्ट्रीय विक्रमही तिने मागे टाकला. तामिळनाडूच्या शेरिन अब्दुल गफूरने रौप्य मिळविले. पुरुषांच्या 100 मी. शर्यतीत हरियाणाच्या नुझरत अलीने यू-21 गटात 10.77 सेकंद अवधी घेत सुवर्ण मिळविले. यू-17 विभागात महिलांमध्ये तेलंगणाच्या जीवनजी सदानंद कुमारने सुवर्ण व तामिळनाडूच्या रुतिका सर्वाननने रौप्य मिळविले. दोघींनी 12.26 से. वेळ नोंदवली.

कर्नाटकाला चार पदके

कर्नाटकाने सायकलिंगमध्ये एकूण चार पदके पटकावली. मेघा गुगडने यू-21 वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये रौप्य, मुलांच्या विभागात राजू बातीने कांस्य, यू-17 मुलींच्या विभागात सौम्या अनंतपूरने कांस्य, यू-17 मुलांच्या टाईल ट्रायलमध्ये संपत पसामेलने कांस्यपदक मिळविले. विशेष म्हणजे कर्नाटकातील बागलकोट व विजापूर येथील हे रहिवासी आहेत.

Related Stories

दीपक पुनियासह दोन मल्लांना कोरोनाची बाधा

Patil_p

अरुण भारद्वाजची कौतुकास्पद कामगिरी

Patil_p

गावसकरांचे असेही ‘अर्धशतक’…आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव!

Patil_p

एटीपी क्रमवारीत व्हेरेव्ह चौथ्या स्थानावर

Patil_p

केएल राहुल पंजाब किंग्सशी फारकत घेण्याची शक्यता

Patil_p

निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!