Tarun Bharat

ऍपलची नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर

जुन्या व नवीन आयफोनला सिस्टम वापरता येणार

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया

ऍपलने आपल्या नवीन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमच्या रुपाने आयओएस 14चे सादरीकरण केले आहे. या नवीन आयओएस व्हर्जनमध्ये विविध प्रकारच्या  इंटरफेस पातळीवर स्पर्धा निर्माण केली आहे. यामध्ये ऍप लायब्ररी आणि रिडिजाइन व्हिजेटचाही समावेश आहे. आयओएस 14 अपडेट फिक्चर इन फिक्चर(पीआयपी)सपोर्टसोबत देण्यात आली आहे. यासह अन्य सुविधाही सदरच्या ऑपरेटिंग सिस्टममधून ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे ऍपलने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.

व्हिडीओसह सोबत ऍपलने अपग्रेडेड सिरीजचे सादरीकरण केले आहे. यामध्ये फुल स्क्रीन इंटरफेस नाही आहे. सध्या कोणत्याही स्क्रीनला व्हीजिट देऊ शकतो. यासह आयओएस 14 मध्येच एक ट्रांसलेशन ऍपलाही जोडले आहे की जे दोन वेगवेगळय़ा भाषांमध्ये टप्याटप्याने ट्रांसलेशन ऍप ही जोडण्याची सोय मिळणार आहे. तसेच गुगल ट्रान्सलेटलाही टक्कर देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच नवीन अपडेटमध्ये न्यू मेसेज एक्सपीरियंसचा समावेश केला आहे.

नवीन आयओएस 14 सिस्टम सर्व आयफोनवर काम करणार आहे. जे आयओएस 13 सोबत कम्पॅटिबल आहे. याचा अर्थ आहे, की नवीन आयओएस व्हर्जन जुन्या आयफोन 6 एस सह नवीन आयफोन एसइ(2020) सोबत ही काम करणार आहे. आयओएस कम्पॅटिबल डिक्हाईसमध्ये आयफोन एक्सएस, आयफोन एक्स एस, एक्स मॅक्स, आयफोन एक्स आर, एक्स, आयफोन 8 , 8 पल्स, आयफोन 7, 7 प्लस, आयफोन 6 एस, 6 एसप्लस आणि आयफोन एसइ यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विश्वनाथन यांचा राजीनामा

tarunbharat

म्युच्युअल फंड कंपन्यांनी काढले 12,980 कोटी

Patil_p

46,000 टप्पा गाठत सेन्सेक्स नव्या विक्रमावर

Patil_p

रिलायन्स रिटेलमध्ये अबुधाबीची मुबादला करणार 6,247 कोटींची गुंतवणूक

Patil_p

रद्द विमान प्रवासाचे पैसे ग्राहकांना परत

Patil_p

इंडियाबुल्सने 874 कोटींची केली घर विक्री

Patil_p