Tarun Bharat

ऍपलची 22 जूनपासून वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क :

तंत्रज्ञान क्षेत्रातील व आयफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी ऍपलची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद 22 जून रोजी ऑनलाईन स्वरुपात भरणार आहे. ही परिषद सर्व डेव्हलपर्ससाठी मोफत राहणार आहे. ऍपल डेव्हलपर ऍप किंवा वेबसाईटवर ही सोय उपलब्ध होणार आहे.

कोरोना संकटामुळे या कार्यक्रमाचे नियोजन ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर मार्चमध्ये हा कार्यक्रम घेण्याचा विचार होता. परंतु लॉकडाऊन वाढल्याने जूनपर्यंत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. या परिषदेत नेमके काय सादर केले जाणार आहे, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु चालू वर्षात आयओएस 14 वॉच ओएस 7 सोबत मॅकओएस, आयपॅडओएस आणि टीव्हीओएसमधील अत्याधुनिक वर्जन सादर करण्यात येणार आहे, असे समजते.

प्रत्येक कार्यक्रमाची माहिती

जूनमध्ये ग्लोबल डेव्हलपर्स कम्युनिटीकडून ऑनलाईन प्रत्येक इव्हेन्टची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनी नवीन साधनेही सादर करणार आहे, असे ऍपलचे वरिष्ठ अध्यक्ष आणि वर्ल्डवाइड मार्केटिंगचे फिल शिलर यांनी सांगितले आहे.

Related Stories

बजाज फायनान्सचा नवा व्यवसाय

Patil_p

मॅक्रोटेक डेव्हलपर्स 50 कोटी डॉलर्स गुंतवणार

Patil_p

एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार

Patil_p

लॉकडाऊनमुळे रोख व्यवहारांमध्ये घट

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्सची 499 अंकांची उसळी

Patil_p

सलग तिसरे सत्रही शेअरबाजारासाठी चिंतेचेच

Amit Kulkarni