Tarun Bharat

ऍमी जॅक्सनचा झाला बेकअप

इन्स्टाग्रामवरील सर्व छायाचित्रे हटविली

प्रख्यात अभिनेत्री आणि मॉडेल ऍमी जॅक्शन नेहमीच स्वतःच्या सीजलिंग छायाचित्रे आणि व्हिडिओजमुळे चर्चेत राहते. ऍमी स्वतःच्या प्रोफेशनल तसेच वैयक्तिक आयुष्यावरूनही प्रसिद्धीच्या झोतात असते. ऍमीचा प्रियकर जॉर्ज पानायिटू याच्यासोबत बेकअप झाला आहे. ऍमी दीर्घकाळापासून जॉर्ज सोबत रिलेशनशिपमध्ये होती.

ऍमी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर प्रियकर जॉर्जसोबतची छायाचित्रे शेअर करायची. पण आता तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर जॉर्जसोबतचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. तिने जॉर्जसोबतची सर्व छायाचित्रे हटविली आहेत.

ऍमी ब्रिटिश उद्योजक जॉर्जला 2015 पासून डेट करत होती. 1 जानेवारी 2019 रोजी जॉर्जने तिला झाम्बियामध्ये प्रपोज केले होते. दोघांनी ऑफिशियल एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये ऍमीने पुत्राला जन्म दिला होता.

ऍमीने अनेक बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच प्रसिद्ध मॉडेल म्हणून तिचे नाव घेतले जाते. ऍमी सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नाही. पण आता बेकअप झाल्याने ऍमी पुन्हा भारतात येण्याची शक्यता आहे.

Related Stories

राणादा आणि पाठकबाईंनी चाहत्यांना दिला सुखद धक्का

Kalyani Amanagi

शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतली आर्यनची भेट

Archana Banage

मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणरा पूज भट्ट

Patil_p

जीवनपटात श्रद्धाच्या जागी नुसरत भरुचा

Amit Kulkarni

टायगर अन् दिशा यांच्यात ब्रेकअप

Patil_p

विचार करायला लावणारी फोटो प्रेम

Patil_p