Tarun Bharat

ऍमेझॉनने गाठला 10 लाख विक्रेत्यांचा टप्पा

मुंबई

देशातील दहा लाख विपेते आता लोकप्रिय इ-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनवर आपल्या वस्तूंची विक्री करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दहा लाख विक्रेत्यांचा महत्त्वाचा टप्पा कंपनीने नुकताच पूर्ण केला आहे.

2013 मध्ये भारतामध्ये सदर कंपनीची सुरुवात झाली होती, त्यावेळी फक्त 100 विपेते त्यांच्यासोबत होते. आज त्यांच्यासोबत असणाऱया विपेत्यांची संख्या 10 लाखावर पोहोचली आहे. कंपनीच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. टायर 2 आणि टायर 3 शहरांमधील लघु आणि मध्यम स्थानिक व्यवसायिक विपेते ऍमेझॉन प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी 2020 नंतर साडेचार लाख इतके नवे विपेते ऍमेझॉनशी जोडले गेले आहेत. यामध्ये 1 लाख नवे स्थानिक ऑफलाइन रिटेलर्सचा समावेश आहे.

Related Stories

हिमाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

चाचणीनंतरच संशयितावर अंत्यसंस्कार

Patil_p

दहशतवाद हाच पाकचा मुख्य उद्योग : जयशंकर

Amit Kulkarni

भारताने केली अग्नी प्राइम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Abhijeet Khandekar

शेतकरी संघटनांशी पुन्हा मंगळवारी चर्चा

Patil_p

गेल्या 10 महिन्यापासून बंद असलेल्या ‘या’ राज्यातील शाळा आजपासून सुरू

Tousif Mujawar