Tarun Bharat

ऍशेस मालिकेतील तिसरी कसोटी उद्यापासून

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेतील यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱया कसोटीला येथे रविवारपासून (बॉक्सींग डे) प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आता या मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला असून इंग्लंडचा संघ आपले आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्न करेल. रविवारी पहाटे पाचपासून सामन्याला सुरुवात होईल

ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने केवळ चार दिवसांच्या कालावधीत एकतर्फी जिंकून इंग्लंडवर निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. क्रिकेटच्या सर्वच विभागात इंग्लंडची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याची कबुली इंग्लंडच्या कर्णधाराने दिली आहे. रविवारपासून या मालिकेत खेळविल्या जाणाऱया तिसऱया कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी सुमारे 70 हजार प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत 0-2 असा पिछाडीवर आहे. उभय संघामध्ये खेळविण्यात येत असलेल्या ऍशेस मालिकेच्या इतिहासात केवळ एकदाच म्हणजे 1936-37 या कालावधीत पहिले दोन सामने गमाविल्यानंतर दिवंगत सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या ऑस्ट्रेलियन संघाने मुसंडी मारत ऍशेस मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. मात्र यावेळी पहिल्या दोन सामन्यातील झालेल्या चुका सुधारून तिसऱया कसोटीत इंग्लंडचा संघ विजयासाठी झगडेल, असे कर्णधार रुटने म्हटले आहे. इंग्लंडकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज असूनही त्यांना पहिल्या दोन सामन्यात यश मिळू शकले नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत मोठी धावसंख्या उभी केली. या मालिकेतील झालेल्या दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या लाबुशानेने पहिल्या डावात शानदार शतक झळकविले. ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्यांना त्यांच्या मायभूमीत पराभूत करणे इंग्लंडला खूपच अवघड जाईल. कर्णधार रुटने आपल्या वेगवान गोलंदाजांना कशाप्रकारे गोलंदाजी करावी याचे योग्य मार्गदर्शन केले नसल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंगने म्हटले आहे.

तिसऱया कसोटीसाठी इंग्लंड संघात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. बर्न्स किंवा हसीब हमीदच्या जागी क्रॉलेला तसेच पोपच्या जागी बेअरस्टोला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सला ऍडलेड कसोटी हुकली होती. आता तो मेलबर्न कसोटीमध्ये खेळणार आहे. हॅजलवुड, कमिन्स हे तिसऱया कसोटीत अधिक प्रभावी गोलंदाजी करू शकतील. नवोदित बोलँडला आपल्या घरच्या मैदानावर कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पण संघातील इतर खेळाडू जखमी झाल्यास त्याला या कसोटीत खेळता येईल.

Related Stories

रियल माद्रीदचा सामना बरोबरीत

Patil_p

आरसीबीची रणनीती, फोकस होल्डरवरच!

Patil_p

लक्ष्य सेन उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

Patil_p

लंकेचा ऑस्ट्रेलियावर पहिला मालिकाविजय

Patil_p

बेंगळूर बुल्स, हरियाणा स्टीलर्स संघांचे विजय

Patil_p

केनियाच्या चेपकोएचचा विश्वविक्रम

Patil_p
error: Content is protected !!