Tarun Bharat

ऍशेस मालिकेतील शेवटची कसोटी आजपासून

होबार्ट : इंग्लंड व यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पाचवी व शेवटची कसोटी शुक्रवारपासून येथे सुरू होत असून ऑस्ट्रेलियाने पहिले तीन सामने जिंकून मालिका याआधीच जिंकली आहे. मात्र सिडनीतील चौथ्या कसोटीत इंग्लंडने सुधारित प्रदर्शन करीत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले होते. तसेच प्रदर्शन येथील सामन्यात करून पत राखण्यासाठी इंग्लंड संघ प्रयत्न करेल. भारतीय वेळेनुसार ही डे-नाईट कसोटी सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे.

ब्रिस्बेन, ऍडलेड व मेलबर्न येथे झालेल्या कसोटी मोठय़ा फरकाने जिंकून ऑस्ट्रेलियाने ऍशेस स्वतःकडेच राखल्या आहेत. सिडनी कसोटीत मात्र इंग्लंडने त्यांची विजयी घोडदौड रोखण्यात यश मिळविले होते. मात्र इंग्लंडला यासाठी काही प्रमाणात किमतही मोजावी लागली आहे. यष्टिरक्षक जोस बटलरच्या बोटाला दुखापत झाल्याने तो मायदेशी परतला आहे तर अष्टपैलू बेन स्टोक्सला साईडस्ट्रेन आहे. याशिवाय मध्यफळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या बोटालाही दुखापत झाली आहे.

असून या कसोटीतील त्याच्या सहभागाबाबतही साशंकता आहे. असे असले तरी इंग्लंड संघ स्टोक्स व बेअरस्टो यांना फक्त फलंदाज म्हणून खेळविण्यास तयार असून सॅम बिलिंग्सला यष्टिरक्षणाची जबाबदारी मिळू शकते. तसे झाल्यास बिलिंग्सची ही पदार्पणाची कसोटी असेल. कर्णधार रूटने प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळण्याचे आवाहन सहकाऱयांना केले असले तरी अंतिम अकरा खेळाडू निवडणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे.

ऑस्ट्रेलिया संघात ट्रव्हिस हेडचे पुनरागमन झाले असल्याने तो मध्यफळीत खेळेल. त्यामुळे सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतके नोंदवलेल्या उस्मान ख्वाजाला सलामीस खेळविण्यात येईल. सलामीवीर मार्कस हॅरिसला या सामन्यातून वगळण्यात आले आहे. सिडनीमध्ये ख्वाजाला हेडच्या जागी घेण्यात आले होते.

Related Stories

सात्विक साईराज, चिराग शेट्टी विश्व टूर फायनल्ससाठी पात्र

Patil_p

कसोटी मानांकन यादीत अश्विन दुसऱया स्थानी कायम

Patil_p

श्रीलंका-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Patil_p

बुद्धिबळ जगतात ऑनलाईन स्पर्धांची धूम

Patil_p

भारतीय कसोटी संघाचा सराव सामना आजपासून

Patil_p

इंग्लंड क्रिकेट संघाला दंड

Patil_p