Tarun Bharat

ऍस्टोन व्हिला-एव्हर्टन सामना लांबणीवर

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील ऍस्टोन व्हिला आणि एव्हर्टन यांच्यातील गुरूवारी होणारा सामना कोरोना समस्येमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा नव्याने होत असल्याने येथील परिस्थिती बिकट झाली आहे. दरम्यान गेल्या आठवडय़ापासून ऍस्टोन व्हिलाचा संपूर्ण संघ आणि प्रशिक्षक वर्गाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या क्लबमधील 14 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने हा सामना लांबणीवर टाकण्यात आला आहे. सदर सामना लांबणीवर टाकण्याची विनंती ऍस्टोन व्हिलातर्फे करण्यात आली होती. आता हा सामना कदाचीत येत्या रविवारी खेळविला जाईल. त्याचप्रमाणे न्यूकॅसल युनायटेडचा सामनाही पुढे ढकलण्यात आला असून आता तो 23 जानेवारीला खेळविण्यात येईल.

Related Stories

सनरायजर्स हैदराबादचा एकतर्फी विजय

Patil_p

प्रज्नेश गुणेश्वरन पराभूत

Patil_p

जॉफ अलार्डाईस आयसीसीचे नवे सीईओ

Patil_p

इंग्लंडला 130 धावांची आघाडी, जो रूटचे झुंजार द्विशतक

Patil_p

सॅफ यू-17 चॅम्पियनशिपमध्ये भारताला जेतेपद

Amit Kulkarni

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला धोंडशिरेची दुखापत

Patil_p
error: Content is protected !!