Tarun Bharat

एअर इंडियाचे सर्व बुकींग 30 एप्रिलपर्यंत बंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांचे बुकींग होणार नसल्याचे जाहीर केले आहे.   

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर 15 एप्रिलला केंद्र सरकार कोणता निर्णय घेईल, त्यावर विमानाचे बुकींग कधीपासून सुरू करायचे ते ठरेल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

दरम्यान, एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत सर्वच बुकिंग बंद केल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का? याची चिंता आता देशवासीयांना लागली आहे. 

Related Stories

कोरोना : पंजाबमध्ये मागील 24 तासात 60 मृत्यू, तर 3,187 नवे रुग्ण

Tousif Mujawar

मलिक, देशमुख पुन्हा कोर्टात; बहुमत चाचणीत मतदानासाठी मागितली परवानगी

Archana Banage

देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

datta jadhav

देशात रुग्णसंख्या 23 लाखांच्या पुढे

Patil_p

‘स्थायी’कडून 743 कोटीचे अंदाजपत्रक; महापौरांच्याकडे सादर

Abhijeet Khandekar

अमृतसर पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात सिद्धू

Patil_p