Tarun Bharat

एअर एशियाची 32.67 टक्क्यांची हिस्सेदारी टाटा सन्सकडून खरेदी

हिस्सेदारीची विक्री 276.10 कोटांना

मुंबई : मलेशियाई एअरलाईन्स कंपनी एअर एशिया बेरहाद यांनी एअरएशिया इंडियामध्ये आपली 32.67 टक्के हिस्सेदारी टाटा सन्सला 276.10 कोटी रुपयांना विकली आहे. या व्यवहारानंतर एअर एशिया बेरहाद यांची हिस्सेदारी फक्त 16.33 टक्के राहिली आहे.

मलेशियाई स्टॉक एक्सचेंजला एका फायलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एअर एशिया इंडिया लिमिटेडच्या (एएआयएल) बोर्ड ऑफ डायरेक्टरने 29 डिसेंबर रोजी एएआयएलमध्ये कंपनीचे 10 रुपये मूल्याचे 49 कोटी समभाग टाटा सन्स लिमिटेड यांनी शेअर परचेज ऍग्रीमेंटच्या आधारे विकले आहेत. टाटा सन्सला 31 मार्च 2021 रोजी पहिला व्यवहार पूर्ण करावा लागणार आहे. अन्यथा समभाग परचेज ऍग्रीमेंट (करार) रद्द करावा लागणार असल्याची माहिती आहे.

आता टाटा सन्सची हिस्सेदारी 51 टक्के

हिस्सेदारी विकण्याअगोदर एएआयएलमध्ये एअर एशिया बेरहादची हिस्सेदारी 49 टक्के होती आणि यामध्ये टाटा सन्सचा हिस्सा हा 51 टक्के राहिला होता. परंतु हा व्यवहार झाल्यानंतर आता कंपनीमध्ये टाटा सन्सची हिस्सेदारी वधारुन 83.67 टक्के झाली आहे. एअर एशिया बेरहादची हिस्सेदारी फक्त 16.33 टक्के राहिली आहे.

एअर एशिया बेरहाद एएआयएलमध्ये शिल्लक असलेली 16.33 टक्के हिस्सेदारी 2 टप्प्यात विकणार आहे. 1 मार्च ते 30 मे 2022 या कालावधीत पुट ऑप्शनचा पहिला टप्पा सादर होईल.

Related Stories

सेन्सेक्सची दुसऱया सत्रात 673 अंकांची झेप

Patil_p

पोलादाच्या किंमती वाढल्या

Patil_p

चांगल्या उत्पन्नामुळे जस्ट डायलचा समभाग तेजीत

Patil_p

देशातील मॉल-शोरुममधील कामगारांचे रोजगार धोक्यात

tarunbharat

बाटाचा व्यवसायामध्ये विस्ताराचा घाट

Patil_p

मारूतीच्या सुपर कॅरीने केला लाखाचा टप्पा पार

Patil_p