Tarun Bharat

एएफसीच्या कोरोना मोहिमेत बाला देवीचा समावेश

नवी दिल्ली

 कोरोना व्हायरस प्रसारामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. जनतेत कोरोना संदर्भातची निर्माण झालेली दहशत कमी करण्याकरिता एएफसीने कोरोना जागरूकता मोहिम हाती घेण्याचे ठरविले आहे. या मोहिमेमध्ये जागतिक स्तरावरील फुटबॉलपटूंचा समावेश करण्यात आला असून यामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार बाला देवी सहभागी होणार आहे. आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या कोरोना व्हायरस जागरूकता मोहिमेमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री तसेच माजी कर्णधार बायचुंग भुतिया सहभागी झाले आहेत. कोरोनाशी लढत देण्याकरिता संपूर्ण जगातील जनता एकत्र येण्यासाठी या मोहिमेद्वारे संदेश देण्यात येणार आहे. युरोपमधील अव्वल विभागीय लीग स्पर्धेत खेळणारी बाला देवी ही भारताची पहिली महिला फुटबॉलपटू आहे. चालू वर्षांच्या प्रारंभी बाला देवीने स्कॉटीश महिलांच्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळण्याकरिता रेंजर्स डब्ल्यूएफसी संघाशी करार केला होता.

Related Stories

दक्षिण-पश्चिम विभागात अंतिम लढत

Patil_p

दक्षिण कोरिया फुटबॉल हंगाम 8 मे पासून

Patil_p

ब्राझीलच्या रोनाल्डीन्होला कोरोनाची बाधा

Patil_p

ईस्ट बंगालची लढत हैदराबाद एफसीशी

Amit Kulkarni

ग्रॅण्डमास्टर पी.इनियनला उपविजेतेपद

Patil_p

विश्वनाथ, आनंद सुवर्णपदकाच्या फेरीत

Patil_p