Tarun Bharat

एएफसीच्या कोरोना व्हायरस मोहिमेत भुतियाचा समावेश

नवी दिल्ली

 कोव्हिड-19 च्या भारतातील प्रसारामुळे जनतेत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शासनाकडून भीती बाळगू नये पण सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्तरावर आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशन (एएफसी) कोरोना विरोधी जागृतता मोहीम काढण्याचे ठरविले आहे. या मोहिमेमध्ये भारताचा माजी कर्णधार बायचुग भुतिया सहभागी होणार आहे. कोरोना व्हायरसची लढत देण्याकरिता जागतिक स्तरावर एकी राखणे महत्त्वाचे आहे. विश्व आरोग्य संघटनेतर्फे विविध देशांमध्ये अशा मोहिमेचे आयोजन करताना ठराविक नियमावलीचा प्रस्ताव ठेवला आहे. एएफसीच्या या मोहिमेमध्ये विविध देशांचे मान्यवर सहभागी होणार आहेत. 2014 साली भुतियाचा एएफसीतर्फे आशियाई फुटबॉल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.

Related Stories

मेयर्सच्या नाबाद शतकामुळे विंडीज सुस्थितीत

Patil_p

बार्टी, प्लिस्कोव्हा तिसऱया फेरीत

Patil_p

गावसकर नेट्समधील खराब खेळाडू !: मोरे

Patil_p

वनडे मानांकनात मितालीने अग्रस्थान गमविले

Patil_p

पहिल्या क्वॉलिफायरसाठी मुंबई-दिल्ली निश्चित

Patil_p

नव्या आयपीएल संघांसाठी 17 ऑक्टोबरला लिलाव

Patil_p