Tarun Bharat

एकत्र दिसून येणार रशिया-अमेरिका

बायडेन यांचे पुतीन यांना निमंत्रण ः तणाव संपविण्याचा पुढाकार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट होऊ शकते. दोन्ही महासत्तांच्या नेत्यांच्या प्रस्तावित बैठकीवर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती व्हाइट हाउसकडून देण्यात आली आहे.

रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी बैठक झाल्यास ती दोन्ही देशांमधील तणाव संपुष्टात आणणे आणि संबंधांबद्दल सकारात्मक पुढाकारावरून असेल असे बायडेन यांचे मानणे आहे. सद्यस्थितीत या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. अध्यक्ष बायडेन यांनी पुतीन यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होण्यासाठी ही बैठक महत्त्वाची असल्याचे बायडेन यांची मानणे आहे असे उद्गार व्हाइट हाउसच्या सचिव जेन साकी यांनी काढले आहेत.

अजेंडा ठरतोय

या बैठकीसंबंधी चर्चा सुरू असून अजेंडा ठरविण्यात येत आहे. याचबरोबर साकी यांनी बायडेन यांच्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्धता जाहीर करणाऱया एका विधानाचा पुनरुच्चार केला आहे. रशियाकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला नुकसान पोहोचल्यास आमच्या राष्ट्रहितांचे रक्षण करणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले होते.

विस्तृत चर्चा करणार

यापूर्वी मागील महिन्यात बायडेन यांनी पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. युक्रेन आणि क्रीमियाप्रकरणी रशियाच्या सैन्याच्या हालचालींबद्दल बायडेन यांनी चिंता व्यक्त केली होती. याप्रकरणी निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी या दोन्ही देशांच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. अमेरिकेकडून रशियाच्या 32 संस्थांवर घालण्यात आलेली बंदी, 2020 च्या निवडणुकीतील रशियाचा कथित हस्तक्षेप, सॉफ्टवेअर हॅकिंग यासारख्या मुद्दय़ांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

हवामान बदल विषयक कार्यालय

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी एक आदेश काढला आहे. यात विदेश विभागात क्लायमेट चेंज सपोर्ट ऑफिस (सीसीएसओ) सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Stories

‘आयएस’च्या तळांवर एअर स्ट्राइक

Patil_p

कोरोनाचा वर्णभेद : बिगरश्वेतवर्णीयांना अधिक धोका

Patil_p

इंडोनेशियात महापूर; भूस्खलनात 50 जणांचा मृत्यू

datta jadhav

अमेरिका : संरक्षण मंत्रिपदी लॉयड ऑस्टीन यांची वर्णी लागणार

datta jadhav

चीनची विमाने, युद्धनौका पुन्हा तैवानच्या सीमेजवळ

Patil_p

दुबई विमानतळावर आता ‘डोळय़ांचा’ खेळ

Patil_p