Tarun Bharat

एकनाथ खडसेंच्या जावयाचा ईडी कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली होती. गिरीश यांची ईडीकडून चौकशी सुरुच असून त्यांच्या कोठडीत १५ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा कोर्टाने ईडी कोठडीत वाढ केल्याने गिरीश चौधरी यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.

ईडीच्या आरोपानुसार २०१६ मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीची जमीन गिरीश यांच्या नवे विकत घेतली गेली होती. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

या तक्ररीच्या आधारावर ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला होता. दरम्यान जावयाला अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांना पुन्हा ईडीने पुन्हा समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. तसेच त्यांनतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनाही ईडीने समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली आहे.

Related Stories

सोलापूर : रोजंदार गट क्र.१ च्या कर्मचारी सेवा स्थगितीला विरोध

Abhijeet Shinde

जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख आणि मलिक यांच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

Abhijeet Khandekar

हे राज्य ठोकशाहीचे

Patil_p

वरकुटे-मलवडीच्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

Patil_p

पुणे विभागातील 5 लाख 43 हजार 187 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

मौखिक परंपरेतल्या हृदयसंवादाचा प्रभाव साक्षात असतो : डॉ. अरुणा ढेरे

Rohan_P
error: Content is protected !!