Tarun Bharat

एकनाथ खडसे आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.खडसे यांनाही समन्स बजावला होता. आता अशी माहिती आहे की एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून रूग्णलयात असून त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत. बॉम्बे रूग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मूत्रामार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडेस यांना रूग्णलयात दाखल करण्यात आलेलं आहे.

एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला होता. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज ३ मे २०१७ पर्यंत चाललं. त्यानंतर ३० जून रोजी समितीने सरकारला गोपनीय अहवाल सादर केला होता.

Related Stories

शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Abhijeet Shinde

चेक बाऊंस प्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचा ‘हा’ माजी कर्णधार अडचणीत

Kalyani Amanagi

पूरस्थिती समन्वयाने हाताळा

Patil_p

नागासोबत खेळाचे व्हीडीओ सोशल मीडियावर प्रदर्शन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Sumit Tambekar

आजपासून आयपीएलची ‘लस’

Amit Kulkarni

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी विनाअट परवानगी

datta jadhav
error: Content is protected !!