Tarun Bharat

एकनाथ रानडे यांची जयंती विवेकानंद केंद्रातर्फे साजरी

प्रतिनिधी/ बेळगाव

विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते एकनाथ रानडे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजशेखर कोळीमठ उपस्थित होते. भाग्यनगर येथील केंद्र कार्यकर्ते केशव कुलकर्णी यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते आणि विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांची जयंती साधना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. अध्यक्षस्थानी अशोक उळेगड्डी होते.

प्रारंभी निखिल नरगुंदकर यांनी कोळीमठ यांचा परिचय करून दिला. स्वाती दीक्षित, महेश, अशोक उळेगड्डी, किशोर काकडे यांनी यावेळी विचार मांडले. डॉ. वैशाली कित्तूर यांनी एकलची माहिती दिली. रामनाथ नाईक यांनीही आपले विचार मांडले. केंद्रातर्फे डॉ. वैशाली व डॉ. रामनाथ नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

केशव कुलकर्णी, आनंद अरळीकट्टी, प्रतिभा धामणकर, ज्योती तासगावकर, शांतला एस., सौरभ यांनी भजन सादर केले. सुहास जोशी यांनी वेस्ट इंडिजमधील कामाचा आणि विद्यार्थीदशेत असताना एकनाथ रानडे यांच्या भेटीचा अनुभव कथन केला. यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचेही स्मरण करण्यात आले. 2020 साली होणाऱया विवेकानंद केंद्राच्या सुवर्णवर्षाच्या तयारीची सुरुवातही या कार्यक्रमाने होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Stories

देसूर येथे वीट व्यवसायाला लवकरच प्रारंभ

Amit Kulkarni

चव्हाट गल्ली परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

परिवहन कर्मचाऱयांच्या संपावर पर्यायी व्यवस्था

Amit Kulkarni

आधारकार्ड नोंदणीसाठी पोस्ट कार्यालयांमध्ये गर्दी

Amit Kulkarni

इन्स्टंट फूड खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

आनंदनगरातील डेनेजवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni