एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रतीक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काल विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी माध्यमाशी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला विलिन व्हावं लागेल. अन्यथा त्यांचा गट मूळ पक्षापासून विलिन झाला नाही तर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही असा एकप्रकारे इशाराचं त्यांनी दिला आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे जाईल वगैरे वगैरे.. असा गैरसमज शिंदे गट पसरवत आहे. पण शिवसेनेची एक घटना आहे, जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बनवली आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. त्यामुळे त्यांना आता विलिन व्हावं लागेल नाहीतर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा- कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारचीचं; एकनाथ शिंदे
आमदारांच्या फुटीबाबत पक्षांतरबंदी कायदा आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार बरोबर नसतील तर त्या सर्वांवर अपात्रतेची कारवाई होईल. दोन तृतीयांश आमदार जरी शिंदे यांच्याकडे गेले तरी त्या कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपमध्ये किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल शिवसेनेचा भगवा त्यांच्या खांद्यावर राहणार नाही एकनाथ शिंदे गटाकडून पक्षफुटीबाबत होणाऱ्या प्रचारावर पक्षांतर बंदी कायदा आणि त्याचे नियम यांचा दाखला देत त्यांनी भाष्य केले.
एकनाथ शिंदे गटाला विलीन व्हावे लागेल,अन्यथा…; निलम गोऱ्हे
Advertisements